घररायगडRaigad : ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह; राज ठाकरेंनी केलं ध्वजारोहण

Raigad : ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह; राज ठाकरेंनी केलं ध्वजारोहण

Subscribe

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज (2 जून) तिथीनुसार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा रायगडावर पार पडतो आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत राज्यातील राजकीय दिग्गज मंडळी, शिवप्रेमी आणि मावळ्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते रायगडावर ध्वजारोहण पार पडलं. (Excitement of 350th Shivaji Rajabhishek Day at Raigad, Raj Thackeray hoisted the flag)

वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन आजच्या दिवशी 350 वर्षांपूर्वी शपथ घेत ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे रायगडावर  मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, राम शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय मंडळींनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजेरी लावली. यांच्याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहपरिवार रायगडावर हजेरी लावली होती.

- Advertisement -

रायगडावर फुलांची आरास
350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी संपूर्ण रायगडावर फुलांची आरास करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आलं. महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा मूर्तीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी दुग्धाभिषेक केला. 

- Advertisement -

हेही वाचा – PHOTO : 350 व्या शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडाला शिवस्वरुप

राज्य सरकारकडून शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त 350 कोटींचा निधी
शिवराज्याभिषेक दिनाचे हे 350 वे वर्षं असल्यामुळे विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पामध्ये 350 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यासंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर अंगी स्फुरण चढणार नाही, असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा आपण उत्साहात साजरा करत आहोत. महाराष्ट्र सरकारतर्फे शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध कार्यक्रमांसाठी 350 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

राज्यात सार्वजनिक उद्यानं विकसित केली जाणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यातील आंबेगावात, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या ठिकाणी दृकश्राव्य माध्यम सुविधेसह छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार आहेत. या उद्यानांमध्ये छत्रपती शिवरायांची जीवनगाथा प्रदर्शित केली जाईल. शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारले जाणार आहे. शिवराज्याभिषेक दिन सदैव स्वराज्याची, सार्वभौमत्वाची प्रेरणा देणारा दिवस. या दिवसानिमित्त रायगडावर राज्य सरकारतर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याचं तर रायगडाच्या पायथ्याशी १ ते ७ जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे”, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडीओमध्ये दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -