घरमुंबईपालिका शाळेत शिका, हमखास नोकरी मिळवा!

पालिका शाळेत शिका, हमखास नोकरी मिळवा!

Subscribe

मुंबई महापालिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या नोकर भरतीमध्ये प्राधान्य मिळणार आहे.

महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मनपा शाळेत शिक्षणाचा दर्जा काय असेल, याबाबत पालकांच्या मनामध्ये शंका असते. या शाळांमध्ये पाल्याला शिकवल्यानंतर त्याला भविष्यात नोकरी मिळेल का? असा प्रश्न पालकांना पडतो. त्यामुळे ते आपल्या पाल्याचे शिक्षण खासगी शाळांमध्येच पूर्ण करतात. मात्र, आता जर तुमचा पाल्य मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असेल तर त्याला पालिकेच्या भरतीमध्ये नोकरी मिळू शकते. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पालिकेच्या नोकर भरतीत प्राधान्य मिळणार आहे. याबाबतची मागणी शिवसेनने सभागृहात केली होती. शिवसेनेच्या या मागणीला सभागृहात मंजुरी मिळाली आहे.

हेही वाचा – मनपा शाळांच्या फायर ऑडिटबाबत माहिती देण्यास अग्निशमन दल असमर्थ

- Advertisement -

आयुक्तांचा निर्णय, अंतिम निर्णय!

सध्या या निर्णयाला सभागृहात जरी मान्यता दिली असली, तरी या निर्णयासंबंधी अंतिम निर्णय हा मुंबई महापालिकेचे आयुक्त घेणार आहेत. हा प्रस्ताव आयुक्तांसमोर सादर केला जाणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी या निर्णयाला मंजुरी दिली तर या निर्णयाची अंमलबजावणी केली केली जाणार आहे.

हेही वाचा – कर वसूलीचा अनोखा फंडा, विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र

- Advertisement -

…तर पालकांचा कल वाढेल!

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती सुरु आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. हा प्रस्ताव मंजूर झाला तर पालकांचा महापालिकेच्या शाळांकडे कल वाढेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि दर्जा सुधारावी यासाठी माजी विद्यार्थ्यांना ब्रँडअँबेसिडर बनविण्यात येणार आहे.


हेही वाचा – शाळेसाठी विद्यार्थ्यांची ४ किलोमीटरची पायपीट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -