घरमुंबईसुरेश दादा जैन यांची प्रकृती स्थिर

सुरेश दादा जैन यांची प्रकृती स्थिर

Subscribe

वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सुरेश जैन यांची प्रकृती स्थिर असून ते अतिदक्षता विभागात दाखल असल्याची माहिती दिली आहे.

माजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृत्ती खालावल्याने त्यांना मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. पण, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं जे.जे हॉस्पिटल प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सुरेश जैन यांची मंगळवारी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना आधी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जेजेमध्ये उपचारांसाठी मुंबईत दाखल करण्यात आले आहे. रक्तदाब आणि साखरेचे प्रमाण वाढल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सुरेश जैन यांची प्रकृती स्थिर असून ते अतिदक्षता विभागात दाखल असल्याची माहिती दिली आहे.

रक्तदाब, साखरेचे प्रमाण वाढल्याने प्रकृतीत बिघाड

जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी नाशिक मध्यवर्ती कारागृहात असलेल्या जैन यांना मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास छातीत दुखू लागले. तसेच श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कारागृह प्रशासनाने त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय हॉस्पिटलात दाखल केले. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत उपचार करण्यात आले. त्यांना अशक्तपणा आल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न वैद्यकीय अधिकार्‍यांनी केला. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना कारागृह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या आदेशान्वये जिल्हा हॉस्पिटलमधून पुन्हा कारागृहात नेण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी कारागृह प्रशासनाकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची परवानगी मिळाल्यानंतर मुंबईतील जे.जे. हॉस्पिटमध्ये दाखल केले आहे. पण, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -