घरमुंबईमुंबईत आली थंडीची लाट

मुंबईत आली थंडीची लाट

Subscribe

राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे नोंदवण्यात आले आहे. येथे कमीत कमी तापमान ९.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांमध्ये विदर्भात तुरळक पाऊस पडला.

ऐरवी मुंबईत ट्रेन आणि बसच्या प्रवासामध्ये घामाघूम व्हायला होते. पण सध्या मुंबईत वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. कपाटात ठेवलेले स्वेटर, कानटोपी सध्या वापरात आणले जात आहेत. कारण मुंबईमध्ये थंडीची लाट आली आहे. मंगळवारी मुंबईत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळे मुंबईकरांना इतर वेळी न मिळणाऱ्या थंडीचा आनंद लुटता येत आहे. आनंदाची गोष्ट अशी की, डिसेंबरचा महिना मुंबईकरांना आणि संपूर्ण राज्यालाच आल्हाददायक थंडीचा आनंद देणार आहे.

गरमागरम वडे आणि फक्कड चहा

थंडीच्या दिवसात गरम गरम पदार्थ खाण्याची मजाच काही और असते. म्हणूनच मुंबईत ठिकठिकाणी चहाची टपरी आणि वडापावच्या गाड्यांवर गर्दी दिसू लागली आहे. एकूणच मुंबईत थंडीचे वातावरण सेट झाले आहे.

- Advertisement -
माहित आहे का? – हवामान बदलाचे भारतावर वाईट परिणाम

बाजारात आले स्वेटर्स

मुंबईत दरवर्षी परळ येथील केईएम रुग्णालयाच्या मार्गावर स्वेटर्सची दुकाने सजतात. नेपाळी लोकांच्या या दुकानात स्वेटर्समधील अनेक व्हरायटी पाहायला मिळतात. कानटोप्यांपासून ते स्वेटर्सचे अनेक पर्याय या ठिकाणी आहेत. उबदार कपडे घेण्यासाठीही या दुकानात बऱ्यापैकी गर्दी पाहायला मिळत आहे.

वाचा- हिवाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

या राज्यात सगळ्यात कमी तापमान

राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे नोंदवण्यात आले आहे. येथे कमीत कमी तापमान ९.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांमध्ये विदर्भात तुरळक पाऊस पडला. त्यामुळे हवेत गारवा आला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. पुढील दोन दिवस मुंबईत तरी तापमान १६ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -