घरमुंबई'मंदिरे वेळीच न उभारल्याने दहशतवाद वाढला'

‘मंदिरे वेळीच न उभारल्याने दहशतवाद वाढला’

Subscribe

विश्‍व हिंदू परिषदेद्वारा आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत राम मंदिर मुद्यावर विश्व हिंदू परिषदेने आपले मत मांडले.

‘राममंदिरासाठी असणारा संघर्ष आताचा नाही तर १५५८ साली बाबराने मंदिर पाडले तेव्हापासून सुरू आहे. सोरटी सोमनाथ, काशीचे विश्‍वनाथ मंदिर, मथुरेतील कृष्णजन्मस्थान या सर्वच धार्मिक स्थळांसाठी, येथील आस्थेला राष्ट्रीय अभिमान टिकवण्यासाठी आपण संघर्ष करत आलो आहोत. वास्तविक सोमनाथाच्या पार्श्‍वभूमीवर अन्य मंदिरे उभी राहिली असती तर परदेशी आक्रमकांना त्यातून योग्य संदेश मिळाला असता आणि हल्ला करण्याचे साहस त्यांनी केले नसते. यामुळे भारतात दहशतवादही बळावला नसता, हल्लेही झाले नसते. पण वेळोवळी योग्य ती कारवाई घेणे टाळले गेले व त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आलो आहोत”, असे प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केले. विश्‍व हिंदू परिषदेद्वारा आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – तरच आमचा राम मंदिराला पाठिंबा – प्रकाश अांबेडकर

- Advertisement -

‘सोळा कोटी हिंदूंचे बलिदान’

“कोट्यवधी हिंदूंच्या आस्था राम मंदिराशी जोडलेल्या आहेत. त्यासाठी कित्येकांनी बलिदान दिले आहे. सोळा कोटी हिंदूंनी मंदिरासाठी आंदोलन केले आहे. याकूब मेननच्या केससंदर्भात रात्री दोन वाजता तर एका मोठ्या नेत्याच्या अंत्यसंस्कारांचे स्थळ निश्‍चित करण्यासाठीही पहाटे चार वाजता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडले गेले. राममंदिर प्रश्‍नाबाबत मात्र दिरंगाई होत आहे. हिंदूंच्या भावनांचा सन्मान करून सुप्रीम कोर्टाने तातडीने निर्णय घ्यावा व केंद्र सरकारने त्याबाबत कायदा करावा. त्यासाठी आवश्यक तेवढा संघर्ष करण्याची आमची तयारी आहे.” असेही ते म्हणाले. काँग्रेसचे धोरण हे कायमच तुष्टीकरणाचे राहिले आहे असे स्पष्ट करताना ते म्हणाले, १९४७ पासून कायमच काँग्रेसने मुस्लीमधार्जिणे राजकारण केले आहे. भारतीय आस्था नाही तर बाबर, गझनी, औरंगजेब हेच त्यांचे आदर्श राहिले आहेत. बाबर हा ज्यांचा आदर्श असेल ते भारताशी कधीही जोडले जाऊ शकत नाहीत. ते कायमच जिहादच्या मार्गाने जात राहतील. विद्यमान सरकार लवकरच निर्णय घेईल आणि मंदिर बांधले जाईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – राम मंदिरासाठी आरएसएसची ९ डिसेंबरला मेगा रॅली

- Advertisement -

अ‍ॅक्टिव्हिस्ट नाही, अनार्किस्ट

शबरीमाला अय्यप्पा मंदिरप्रवेशाबाबत प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, ज्या अ‍ॅक्टिव्हिस्ट महिला मंदिरप्रवेशाबाबत आग्रही आहेत. वास्तवात त्या अ‍ॅक्टिव्हिस्ट नसून अनार्किस्ट अर्थात अराजकतावादी आहेत. त्या अयप्पाप्रती असणार्‍या आस्थेपायी नव्हे तर त्या आस्थेची थट्टा उडवण्यासाठी तेथे जात आहेत. त्या त्या ठिकाणच्या आस्था तेथील स्थानिक समाजच तयार करत असतो. आस्थेचा विषय न्यायपालिकेशी जोडलेला नसून लोकभावनेशी जोडलेला आहेत, असेही ते म्हणाले.

नामांतरण फक्त आक्रमकांच्या नावाचेच

एखाद्या व्यक्तिचे वा स्थळाचे नाव येथील आक्रमकांवरून ठेवले जात असेल तर त्याला आपला विरोध असल्याचे जैन म्हणाले. नामांतरणाचा हा प्रश्‍न धर्माशी नसून आस्थांशी जोडलेला आहे. ज्या स्थळांना आक्रमकाचे नाव दिले असेल ते बदलण्याबाबत आपला आग्रह कायम असेल असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – राम मंदिरासाठी संतांचे राज्यपालांना निवेदन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -