घरताज्या घडामोडीशरद पवारांनंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी नकार

शरद पवारांनंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी नकार

Subscribe

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेला उधाण आलं आहे. येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडणार आहे. तसेच २१ जूनला निकाल जाहीर होणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. कारण राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगण्यात आलं होतं. तसेच त्यांना संपूर्ण विरोधी पक्षाचा पाठिंबा मिळणार होता. मात्र, पवार यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनण्यास नकार दिला आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी नकार दिला आहे.

- Advertisement -

शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनण्यास नकार दिला आहे. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे नाव सुचवले होते. मात्र, आता फारुख अब्दुल्ला यांनीही राष्ट्रपती पदाचा उमेदवार बनण्यासाठी नकार दिला आहे. परंतु त्यांनी नकार दिल्यानंतर प्रतिक्रिया देखील दिली आहे. माझी जम्मू काश्मीरला जास्त गरज असल्याचे सांगत अब्दुल्ला यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

येत्या काही दिवसांत विरोधी पक्षांशी चर्चा करुन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी समान विरोधी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. दुसरीकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांचेही नाव विरोधी पक्षाच्या उमेदवारीमध्ये घेतले जात आहे. दरम्यान, अब्दुल्ला यांच्या नकारानंतर विरोधी पक्षांकडे राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर पुन्हा एकदा विचार विनिमय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

फारुख अब्दुल्ला हे तीन वेळा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत. याशिवाय ते अनेकवेळा केंद्रात मंत्रीही राहिले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्यानंतर फारुख अब्दुल्ला यांचं नाव सुचवण्यात आलं होतं.


हेही वाचा : बोरिवलीतील आर. एम. भट्टड मार्गावरील उड्डाणपुलाचं आदित्य ठाकरेंकडून लोकार्पण, आता होणार सुरक्षित प्रवास


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -