घरमुंबईवाहनचालक पॉझिटिव्ह निघाला, तरीही...

वाहनचालक पॉझिटिव्ह निघाला, तरीही…

Subscribe

दहा वर्षाचा मुलगा.. ७४ वर्षांची आई अशी मंडळी घरात असताना घराबाहेर पडून कोरोना बाधित रुग्णांच्या उपाययोजनांसाठी झोकून देणार्‍या सहायक आयुक्त म्हणजे आर-मध्य अर्थात बोरीवलीच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे. घरात परतल्यानंतर आई आणि मुलांपासून काही अंतर ठेवून राहत त्यांची विशेष काळजी घेत असतानाच त्यांचा वाहन चालक कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे क्वारंटाईन होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पण सर्व बाजुला ठेवून विभागात कोरेानाचे रुग्ण वाढत असताना क्वारंटाईन होणेवाहन अशक्यच होते. त्यातच मुलाला ताप येवू लागला. त्यामुळे धीर अजुनच खचला. अखरे दोघांच्याही कोरेाना टेस्ट केल्या. पण सुदैवाने दोघांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आणि सुटकेचा निश्वास टाकला. असे कापसे सांगतात. पण त्यानंतर ज्यांची विशेष काळजी मी घेते, तेच आता घरी आल्यावर माझी विशेष काळजी घेतात,असेही कापसे आवर्जुन सांगतात.

महापालिकेच्या आर-मध्य अर्थात बोरीवलीच्या विभागात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने मिळत आहेत. जेव्हा संपूर्ण मुंबईत कोरेानाचा कहर सुरु होता, तेव्हा बोरीवलीत कोरेानाचे रुग्ण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मिळत होते. परंतु मे महिन्यात काहीशी या विभागाने कोरोनाच्या रुग्णांची उचल खाल्ली होती. त्यानंतर थोडेसे प्रमाण कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा वाढू लागले आहे. आतापर्यंत बोरीवलीमध्ये ३९००च्या लगबग एकूण रुग्ण आढळून आले. त्यातील १९०० रुग्ण बरे होवून परतले आहेत. तर २०२९ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. मात्र, सध्या प्रत्येक दिवशी सरासरी १००च्या लगबग आढळून येणार्‍या या विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविडच्या उपाययोजना केल्या जात आहेत. कापसे ७४ वर्षीय त्यांची आई आणि दहा वर्षांचा मुलगा पार्थ त्यांच्यासोबत राहतात. कोविडमध्ये ज्या वयोगटातील माणसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहेत, अशा वयोगटातील व्यक्ती घरी असतानाही आपले कर्तव्य निभावताना कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतानाच कोविडबाधित रुग्णांना सुविधा पुरवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागतात.

- Advertisement -

विशेष म्हणजे त्यांचा वाहन चालक आणि इतर सहकारी कोविड बाधित निघाल्यानंतर, भाग्यश्री कापसे क्वारंटाईन होतात ती काय असे वाटत होते. त्या अनुभवाबद्दल बोलतांना कापसे म्हणतात. ती परिस्थिती फारच वेगळी होती. माझ्या गाडीचा वाहन चालक पॉझिटिव्ह निघाला होता. काही प्रमुख अधिकारी पॉझिटिव्ह झाले होते. फ्रंट लाईनचे अधिकारी कर्मचारी पॉझिटिव्ह येत होते. त्यामुळे मनात थोडीशी धाकधुक सुरु झाली होती. त्याच दरम्यान माझा मुलालाही ताप येवू लागला. त्यामुळे लागलीच कोरोना चाचणी केली. परंतु सुदैवाने दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आणि सुटकेचा निश्वास टाकला.

पण एक सांगते. घरात मी या दोघांपासून थोडे अंतर ठेवूनच संवाद साधत असते. कारण त्यांची सुरक्षितताही तेवढीच महत्वाची आहे. तसं मुलाला माझ्याजवळ झोपायची सवय आहे. सुरुवातीला एक महिना तो भीतीमुळे माझ्याशिवाय झोपलाही. परंतु त्यानंतर मात्र, ’मला कोरोना झाला तरी चालेल,पण मी तुझ्याच जवळ झोपेन’ असा हट्ट धरु लागला होता. पण त्याची समजूत काढल्यानंतर तो ऐकू लागला. आज जेव्हा मी घरी जाते, तेव्हा तो गार्डसारखा माझ्या पाठिशी उभा असतो. त्याचं असं की इमारतीच्या खाली आल्यानंतर मी त्यांना कल्पना देते. त्याप्रमाणे ते दरवाजा उघडून ठेवतात आणि त्याबरोरबच गिझरचे बटनही. मला कुठेही स्पर्श करु देत नाही. पण दरवाज्याजवळ आल्यापासून मी ज्याप्रमाणे चालत जाईल तसे तो सॅनिटाईज करत असतो.

- Advertisement -

माझी आई तशी ७४ वर्षांची आहे. पण स्वयंपाकाची महत्वाची जबाबदारी कोविड काळात तिनेच आपल्या हाती घेतली आहे. पण या कालावधीत तिचे मनोरंजन व्हावे म्हणून संगणकारवरही काही गेम आणि अ‍ॅक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली आहे. त्याप्रमाणे ती थोडे मनोरंजन करते. पण घरात आल्यानंतर माझ्या आणि त्यांचा संवाद हा दीड तासांनंतरच होतो आणि तोही सोशल डिस्टन्स राखून. त्यामुळे मी जेवढी त्यांची काळजी घेते, तेवढी तेही माझी घेत असतात. त्यामुळे मलाही निर्धास्तपणे कामात लक्ष पुरवता येतं. माझ्याप्रमाणेच माझ्या विभाग कार्यालयातील दुकाने व कारखाने विभागाचे अभियंता, आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका असो यांच्याही घरी छोटी छोटी मुले आहेत, वयोवृध्द माणसे आहेत.

परंतु कर्तव्य भावनेने ते काम करत असतात. काहींनी तरी आपल्या बायको,मुलांना गावी पाठवून देत इथे एकटे राहत काम करत आहेत. काही कर्मचारी कुटुंबांपासून दूर महिनोंमहिने इथेच राहत आहे. त्यांना तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे दर्शनही होत नाही. त्यामुळे त्यांचाही हा त्याग खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे मला काम करताना कोणत्याही अडचणी येत नाही. आज आमच्या अभियंत्यांनाही डॉक्टरांप्रमाणे प्रशिक्षण दिलेले आहे. जेणेकरून डॉक्टरांची मदत मिळेपर्यंत ते प्राथमिक सुविधा पुरवून रुग्णांचे जीव वाचवू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -