घरमुंबईदेवनार डम्पिंग ग्राउुंडवरील उर्जा प्रकल्प कामाला मार्चनंतर सुरुवात

देवनार डम्पिंग ग्राउुंडवरील उर्जा प्रकल्प कामाला मार्चनंतर सुरुवात

Subscribe

देवनार डम्पिंग ग्राउुंडवरील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी उुर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्यात येत असून यासाठीची निविदा आता अंतिम टप्प्यात आहे. यासाठी मागवलेल्या निविदांसाठी चार ते पाच कंपन्या पुढे आल्या असून मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल,अशी माहिती महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी महापलिका अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना, ही माहिती दिली. देवनार डम्पिंग ग्राउुंडवरील कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी उुर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रथम ३ हजार मेट्ीक टन कचर्‍यासाठी निविदा मागवली होती. परंतु याला कोणताही प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळे या निविदेत बदल करून यासाठी ६०० मेट्ीक टन कचर्‍यावर प्रक्रिया करून उुर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या निविदेत ६ ते ७ कंपन्यांनी भाग घेतला आहे. त्यामुळे ही निविदा मार्च अखेरपर्यंत उघडून लवकरच महापालिकेच्या मंजुरीने कामाला सुरुवात होईल,असा विश्वास व्यक्त केला.

- Advertisement -

मुलुंड डम्पिंग ग्राउुंडच्या कामाला सुरुवात
मुलुंड डम्पिंग ग्राउुंडमधील कचर्‍याच्या साठवणीची क्षमता संपल्यामुळे ते बंद करण्यात आले. त्यामुळे येथील कचर्‍यावर प्रक्रिया करून जमिन पुन्हा प्राप्त करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी विविध प्रकारच्या परवानगी न मिळाल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. परंतु एक महिन्यांपूर्वी यासर्व परवानगी मिळाल्यामुळे या कामाला सुरुवात करण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

रस्त्यांवरील खड्डयांसाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे अत्याधुनिक अशा कोल्डमिक्सचा वापर करू बुजवले जातात. परंतु कर्मचार्‍यांना याचे प्रशिक्षण नसल्यामुळे तसेच अभियंत्यांच्या देखरेखीखाली हे खड्डे बुजवले जात नसल्याने हे तंत्र असफल ठरल्याचे दिसून येते. त्यामुळे खड्डे बुजवण्याचे प्रशिक्षण कर्मचार्‍यांना देण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या भाषणात केली होती. या सूचनेची दखल घेत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कर्मचार्‍यांना खड्डे बुजवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल,असे स्पष्ट केले. याबाबत अभियंत्यांना अभियंत्यांना आयआयटीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -