घरमुंबईमुंबईत 27 उमेदवारी अर्ज बाद

मुंबईत 27 उमेदवारी अर्ज बाद

Subscribe

अंतिम यादीत १४४ अर्ज पात्र

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा ज्वर वाढला असतानाच मुंबईतील एकूण सहा मतदारसंघांतील २७ अर्ज अवैध ठरले आहेत. यातील बहुतांश अर्ज हे प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने तर अनेकांनी सह्या चुकविल्याने बाद झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण मतदारसंघांवर जर नजर टाकली तरी एकूण १४४ अर्ज पात्र ठरल्याची माहिती बुधवारी निवडणुक आयोगाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, १४४ अर्जांमधून आता किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अवैद्य अर्ज ठरलेल्या अर्जांमध्ये बहुतांश अर्ज हे अपक्ष उमेदवारांचे असल्याने राजकीय पक्षांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळीचा वेग वाढला आहे. मुंबई आणि आसपासच्या मतदारसंघांसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत मंगळवारी संपली. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या या अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी पार पडली. त्यानंतर मुंबईतील मतदारसंघांतील एकूण २७ अर्ज बाद ठरल्याची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. अवैद्य ठरलेल्या अर्जांत सर्वाधिक अर्ज हे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून असल्याचे समोर आले आहे. दक्षिण मध्य मुंबईतून एकूण १२ अर्ज बाद ठरले आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदासंघासाठी 44 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली होती. त्यातील १२ अर्ज अवैध ठरले आहेत. तर 32 नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत. दीपक भागोजी कांबळे यांचा एक अर्ज वैध व एक अर्ज अवैध ठरला आहे. अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये प्रिसिला सॅम्युअल नाडार(अपक्ष), खान अजमल युसुफ (अपक्ष), सरोज मिलिंद माहुलकर(अपक्ष), केदार रवींद्र सुर्यवंशी(अपक्ष), संजय रमेश भालेराव(बहुजन समाज पार्टी), मोहम्मद इरशाद खान(ऑल इंडिया मायनरिटीज फ्रंट), दीपक भागोजी कांबळे(आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया)आणि अश्विनीकुमार पाठक(लोकदल) यांच्यासह इतर उमेदवारांची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. तर दक्षिण लोकसभा मतदासंघासाठी 17 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली. या नामनिर्देशन पत्रांची बुधवारी छाननी केली असता 2 नामनिर्देशन पत्र अवैध ठरली असून 15 नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांतून एकूण ११० उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते. त्यापैकी छाननीनंतर १३ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र अवैध ठरली असून ९७ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत. यामध्ये मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून २५ उमेदवारांची, मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून २२, मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) लोकसभा मतदारसंघातून २८ आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून २२ उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -