घरमुंबईउडता कबुतर पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात

उडता कबुतर पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात

Subscribe

हातावर तुरी देऊन पळाला होता

अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला सिराज खान मसकूर खान पठाण ऊर्फ उडता कबुतर याला अंधेरी येथून गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. कारागृहात असताना सिव्हील रुग्णालयात नेताना सिराज खान हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. गेल्या पाच महिन्यांपासून त्याचा गुजरात पोलीस शोध घेत होते, अखेर त्याला सोमवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

दहा वर्षांपूर्वी अपहरण आणि दरोड्याच्या एका गुन्ह्यात सिराज खान याला तेथील स्थानिक न्यायालयाने आजीवन कारावासासह तीन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. याच गुन्ह्यात तो साबरमती सेंट्रल जेलमध्ये बंदिस्त होता. 19 एप्रिल 2018 रोजी त्याला साबरमती जेलमधून उपचारासाठी अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात नेण्यात येत होते, यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सिराज खान हा पळून गेला होता. त्यानंतर त्याच्याविरुद्ध शाहीबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यात त्याचा गुजरात पोलिसांकडून शोध सुरू होता.

- Advertisement -

ही शोधमोहीम सुरू असताना सिराज हा गुजरातहून मुंबईत पळून आला आहे. तो त्याच्या काही साथीदारांना भेटण्यासाठी अंधेरीतील वेस्टर्न हायवे मेट्रो स्टेशनजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, उघडे, प्रमोद सकपाळ, दिपक कोळी, मंगेश शिंदे, भास्कर गायकवाड, अरविंद करंजे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून सिराज खानला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -