घरताज्या घडामोडीमेट्रो २ ब मध्ये युरोपियन कंपनीची गुंतवणुकीची इच्छा

मेट्रो २ ब मध्ये युरोपियन कंपनीची गुंतवणुकीची इच्छा

Subscribe

युरोपीयन डेव्हलपमेंट कंपनीने ए अँड एम इन्फ्रा डेव्हलपमेंट ग्रुपने १०० कोटी रूपयांची आर्थिक गुंतवणुक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी चेंबूर ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यानच्या प्रकल्पासाठी गुंतवणुक करण्यासाठी एका युरोपियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीने महाराष्ट्र सरकारला पत्रव्यवहार सुरू केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या मेट्रो २ ब प्रकल्प ( डीएन नगर ते मानखुर्द) दरम्यानच्या प्रकल्पासाठी गुंतवणुक करण्यासाठी कंपनीने इच्छा व्यक्त केली आहे. युरोपीयन डेव्हलपमेंट कंपनीने ए अँड एम इन्फ्रा डेव्हलपमेंट ग्रुपने १०० कोटी रूपयांची आर्थिक गुंतवणुक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी कंपनीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिले आहे.

ए अँड इन्फ्रा डेव्हलपमेंट ग्रुपने नुकत्याच एका कंस्ट्रोरियमच्या माध्यमातून ओबेरॉय – ए अँड एम इन्फ्राच्या माध्यमातून भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणुक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी कंपनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित मेट्रो २ ब मार्गाअंतर्गत चेंबूर ते बीकेसी दरम्यानच्या मेट्रो कॉरिडॉरमध्ये गुंतवणुक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात ए एण्ड एम इन्फ्राने २० अब्ज डॉलर्सची गुंतवणुक करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने स्मार्ट शहरांमध्ये गुंतवणुक करणार असल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकल्पांना आर्थिक आधार देण्यासाठी ही गुंतवणुक करत आहोत असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. सरकारच्या प्रकल्पासोबतच खाजगी कंपन्यांनाही प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. बीकेसी येथील प्रकल्पासोबतच आणखी ५०० कोटी रूपयांची गुंतवणुक ही रस्ते प्रकल्प, परवडणाऱ्या दरातले गृहनिर्माण प्रकल्प यासाठी करणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

याआधी मेट्रो २ ब प्रकल्पाअंतर्गत नेमण्यात आलेल्या कंपनीला नियोजित वेळेत चेंबूर ते बीकेसी दरम्यानचे काम पुर्ण करण्यात यश आले नाही. म्हणूनच एमएमआरडीएने एबीझेड – आरसीसी या कंपनीचे कंत्राट रद्द केले. या कामाअंतर्गत ५.९ किलोमीटरच्या टप्प्यात डिझाईन आणि बांधणीची जबाबदार कंत्राट दिलेल्या कंपनीकडे होती. तसेच एमटीएनएल मेट्रो, एसजी बर्वे मार्ग, कुर्ला टर्मिनस, कुर्ला पूर्व, चेंबूर यासारख्या स्टेशनचे काम आणि कार डेपो यासारखे काम पुर्ण करणे अपेक्षित होते. पण हे काम पुर्ण करण्यासाठी मार्च २०१८ ची मुदत देण्यात आली होती. नियोजित वेळेत काम पुर्ण न झाल्याने अखेर एमएमआरडीएने नवीन निविदा प्रक्रिया सुरू केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -