घरमुंबईलॉ कॉलेजात दुसर्‍या वर्षी अनुदानित वर्गात प्रवेश द्यावा

लॉ कॉलेजात दुसर्‍या वर्षी अनुदानित वर्गात प्रवेश द्यावा

Subscribe

अनेक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे विनाअनुदानित वर्गातील विद्यार्थ्यांना अनुदानित वर्गात प्रवेश न देण्याची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.

लॉ अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षी विनाअनुदानित वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या वर्षात जागा असूनही अनुदानित वर्गामध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे विनाअनुदानित वर्गातील विद्यार्थ्यांना अनुदानित वर्गात प्रवेश न देण्याची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.

लॉ अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या माध्यमातून घेण्यात येते. अनेकदा मेरिटमुळे किंवा अन्य कारणाने विद्यार्थ्यांना अनुदानित वर्गात प्रवेश दिला जातो. त्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात त्यांच्या इच्छेप्रमाणे अनुदानित अथवा विनाअनुदानित वर्गात प्रवेश घेण्याची मुभा देण्यात येते. मात्र ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षी विनाअनुदानित वर्गात प्रवेश मिळतो. त्यांना पुढील वर्षी मात्र केवळ फक्त विनाअनुदानित वर्गातच प्रवेश घेण्याची सक्ती ठेवण्यात आली आहे. त्यामुळे द्वितीय वर्षापासून जागा असूनही शिवाय गुणवत्ता असूनही पुढील वर्षी अनुदानित वर्गात प्रवेश मिळत नाही ही अट रद्द करुन अनुदानित जागी विनाअनुदानित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. जेणेकरुन गरीब हुशार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक भुर्दड कमी होईल आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल अशा मागणीचे निवेदन युवासेनेने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना दिले. यावेळी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, धनराज कोहचाडे, महादेव जगताप आणि युवासेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -