घरमुंबईमुंब्रा स्थानकात रूग्णवाहिके अभावी रूग्णाने गमवले पाय

मुंब्रा स्थानकात रूग्णवाहिके अभावी रूग्णाने गमवले पाय

Subscribe

लाखोची लोकसंख्या असलेल्या मुंब्रा स्थानक परिसरात मात्र रुग्णवाहिकेचा अभाव शुक्रवारी जाणवला. रेल्वे अपघातात गंभीर जखमीला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांना अर्धा तास रुग्णवाहिका मिळाली नाही. अखेर त्या रूग्णाला रेल्वे लोकलने ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णवाहिका न उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जखमीने आपले दोन्ही पाय गमावले.

- Advertisement -

शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्र २ वरून मुंबईकडे जाणारी लोकल पकडण्याची धडपड करताना एक इसम तोल गेल्याने प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये पडला या अपघातात त्याचे दोन्ही पाय गेले. ट्रेन गेल्यानंतर आरपीएफ आणि जीआरपी जवानांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा शोध घेत होते, मात्र अर्धा तास रुग्णवाहिका मिळालीच नाही. अर्धतास दोन पाय गमावलेला इसम वेदनेने विव्हळत होता. अखेर त्याला स्थानकावरील नागरिकांनी रेल्वे लोकलमध्ये टाकून ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची ओळख पटलेली नाही. लाखोंची लोकसंख्या असलेले आणि मुंब्रा, पारसिक रेल्वे ट्रॅकवर वारंवार होणारे अपघात तसेच मुंब्रा बायपासवर नेहमीच होणारे अपघात अशी परिस्थिती असतानाही मुंब्रा परिसरात रुग्णवाहिका नसल्याने नागरिकांमध्ये नाराजगी होती. दरम्यान मुम्बर्स स्थानक दरम्यान अपघातग्रस्तांना दिलासा देण्य्साठी रुग्णवाहिका आवश्यक आहे. तेव्हा मुंब्रा परिसरात रुग्णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -