घरमनोरंजनत्या व्हिडिओमुळे पायल रोहतगीला केली पोलिसांनी अटक

त्या व्हिडिओमुळे पायल रोहतगीला केली पोलिसांनी अटक

Subscribe

बिग बॉस फेम अभिनेत्री पायल रोहतगीला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. पायल रोहतगीच्या टीमने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पायलने काही तासांपूर्वी आपल्या सोशलमिडीयाच्या अकाऊंटवर (ट्वीटरवर) व्हिडीओ प्रदर्शित केला होता. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी तीला अटक केली आहे. पोलिसांनी पायल रोहतगीला अहमदाबादमधून अटक केली आहे.

काही तासांपूर्वीच युवा काँग्रेस नेता चर्मेश शर्मा यांनी पायल रोहतगीच्या वक्तव्या विरोधात पोलिसात तकरार दाखल केली होती. या तक्रारारीत पायल अनेक आरोप लावण्यात आले आहेत.
पायल रोहतगी ने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर लिहीलं आहे की, ‘मला राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्यावर एक व्हिडीओ शेअर केला म्हणून अटक केली आहे. जो व्हिडीओ मी गुगलवर माहिती घेऊन तयार केला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही गोष्ट आता जोक झाली आहे.’असं ट्वीट करत पायलने राजस्थान पोलिस, पंतप्रधान यांच्या ऑफिशीअल ट्वीटर अकाऊंटला टॅग केले आहे.

- Advertisement -

पायलवर आरोप आहेत की, पायलने पं.मोतीलाल नेहरू यांच्या कुटूंबातील महिला आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी,राजीव गांधी यांच्यावर वाईट शब्दात भाष्य केले होते. ज्यानंतर तीच्यावर ही कारवाई करण्यात आली. पायल रोहतगी विरोधात आईटी अधिनियम ६६ आणि ६७ कलमांअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पायलने हा व्हीडीओ २७ सप्टेंबरला फेसबुकवर अपलोड केला होता. त्यानंतर या चर्चेला सुरूवात झाली. गेले काही दिवस पायल सोशल एकाउंटवर काही ना काही व्हिडीओ टाकून वाद ओढावून घेते. या आधी पायल बिग बॉस १३ वर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -