घरमुंबईप्रवेशप्रक्रियेतील पेच कमी होणार

प्रवेशप्रक्रियेतील पेच कमी होणार

Subscribe

व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना दिलासा

इंजिनियरींग, मेडिकल अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेकदा कायदेशीर अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचा खोळंबा होत असून, त्याचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास टाळण्यासाठी सीईटीच्या संकेतस्थळावर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) प्रवेश प्रक्रियेचे नियम जाहीर करण्यात येणार आहे. भविष्यातील प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना तक्रारी व सूचनाही मांडता येणार आहेत.

व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत होणारा गोंधळ लक्षात घेऊन या वर्षापासून मेडिकल, इंजिनीअरिंग, नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परिक्षा सीईटी सेलमार्फत घेण्यात येणार आहेत. त्यामुळे परिक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यास मदत होईल. प्रवेश परीक्षेच्या फेर्‍या सुरू असताना काही कारणांमुळे एखाद्या विद्यार्थ्यास प्रवेश न मिळाल्यास किंवा अचानक नियम बदलल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येतो. अशावेळी हे विद्यार्थी न्यायालयात धाव घेतात.

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने प्रवेश प्रक्रियेत कायदेशीर अडचण निर्माण होऊन संपूर्ण प्रवेशप्रक्रियाच बाधित होते. याचा त्रास सर्वच विद्यार्थ्यांना होतो. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेपूर्वीच विद्यार्थ्यांना प्रक्रियेसंदर्भातील नियम, अटी यांची माहिती उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. ज्यामुळे प्रवेशांच्या नियमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मदत होणार आहे. जेणेकरुन ऐन प्रवेश प्रक्रियेवेळी कोणत्याही नियमात बदल झाला तरी त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होणार नाही व न्यायालयीन प्रकरणांची संख्या कमी करण्यात यश येईल.

ही प्रक्रिया राबवण्याबाबत कक्षाच्या प्राधिकरणानेही सहमती दर्शविली आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना नियमांची माहिती संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. प्रक्रियेच्या नियमांबाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप असल्यास ते संकेतस्थळावरुंन थेट सीईटी सेलला कळवू शकतात. वेळीच नियम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्यास त्यांना प्रवेश प्रक्रियेची माहिती होईल. तसेच काही कारणांमुळे पुढे होणारे कायदेशीर पेच थांबतील.
-आनंद रायते, अध्यक्ष, सीईटी सेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -