घरमुंबईसाडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला आईकडूनच जबर मारहाण

साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला आईकडूनच जबर मारहाण

Subscribe

व्हिडीओ बनवून नवर्‍याला पाठवला

विभक्त झालेल्या पतीला ब्लॅकमेल करण्यासाठी साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण करून त्याचा व्हिडियो पतीला पाठविणार्‍या आईचा प्रताप चव्हाट्यावर आला आहे. व्हिडियो व्हायरल झाल्याने अखेर घटस्फोटीत पती फैयाज शेख यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात 4 मार्च रोजी घटस्फोटित पत्नी हिना शेख हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुंब्रा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तक्रारदार फैयाज शेख आणि घटस्फोटित पत्नी हिना यांचा विवाह झाला होता. त्यांना एक साडेतीन वर्षाचा मुलगा आहे. फैयाज आणि हिना यांच्यात घटस्फोट झाला. वकिलाच्या मध्यस्थीने महिन्याला मुलाच्या पालनपोषणाचा खर्च म्हणून प्रतिमाह 6 हजाराची रक्कम देण्याचे काबुल करण्यात आले. मात्र काही कारणास्तव हा खर्च देण्यास दिरंगाई झाल्याने चिडलेल्या पत्नी हिना हिने पतीला त्रास देण्यासाठी मुलाला उलतन्याने मारहाण केली. हा व्हिडिओ तिने पतीला पाठवला. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात होता. या व्हिडिओमध्ये हिनाने घटस्फोटीत पतीचा राग मुलावर काढला आहे. मी तुझ्यासाठी १० हजार खर्च करते आणि तुझा बाप ६ हजार रुपयेही पाठवत नाही, असा राग हिनाने व्हिडिओत व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर फैय्याजने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हिनाचा घटस्फोटीत पती फैय्याज दुसर्‍या पत्नीसह मुंब्रा येथे राहतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -