घरमुंबईगोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी सकारात्मक – संजय राऊत

गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी सकारात्मक – संजय राऊत

Subscribe

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातसुद्धा भाजपला आव्हान द्यायला शिवसेना सज्ज झाली असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाआघाडीचे सरकार स्थापन केले. भाजपसोबत युती तोडत शिवसेनेने नवा मार्ग अवलंबला. आता महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातसुद्धा भाजपला आव्हान द्यायला शिवसेना सज्ज झाली असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांचे सूचक ट्विट

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले की, गोव्यात भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक असल्याचे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे (एमजीपी) नेते सुधीर ढवळीकर यांनी म्हटले आहे.

आता मिशन गोवा

दरम्यान ट्विट करण्यापूर्वी काल शुक्रवारीच खासदार संजय राऊत यांनी गोव्याबाबत विधान केले होते. लवकरच गोव्यात राजकीय भूकंप होऊन चमत्कार दिसेल, असा दावाच त्यांनी केला होता. त्याचप्रमाणे गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असून शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचंसुद्धा ते म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -