घरमहाराष्ट्रनव्या सरकारच पहिल अधिवेशन; विरोधकांची वॉकआऊटने ओपनिंग

नव्या सरकारच पहिल अधिवेशन; विरोधकांची वॉकआऊटने ओपनिंग

Subscribe

विधानसभेच्या पहिल्याच दिवशी भाजपने नव्या सरकारवर आरोपप्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी वॉकआऊट केले.

‘हे अधिवेशन नियमबाह्य असल्याचा आरोप भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. रात्री अधिवेशनाची अधिसूचना काढल्यामुळे आमच्या आमदारांना मुंबईत पोहोचता आले नाही. बहुमताची चाचणी होत असताना भाजपचे आमदार सभागृहात उपस्थित राहू नये, असे आपल्याला वाटतं का? असा आरोप फडणवीस यांनी यावेळी सरकारवर केला आहे. फडणवीस यांनी उपस्थित केल्यानंतर हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नियम डावलून ‘हे अधिवेशन होत नसल्याचे सांगितले. राज्यपालांनी अनुमती दिल्यानंतरच हे अधिवेशन होत असल्याचे सांगत दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांचे आरोप फेटाळून लावले’. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नवीन मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करुन दिला.

माजी मुख्यमंत्र्यांचा सरकारवर आक्षेप

‘मंत्र्यांची घोषणा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांनी शिवाजी पार्कवर घेतलेल्या शपथ यावर आक्षेप नोंदविला. नेत्यांनी शपथ घेण्याआधी काही नेत्यांची नावे घेतली होती, अशा पद्धतीने नावे घेणे नियमबाह्य असल्याचे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती’, याचाच उल्लेख फडणवीस यांनी सभागृहात केला. तसेच मंत्र्यांची नियुक्ती नियमबाह्य ठरत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

- Advertisement -

हंगामी अध्यक्ष का बदलले?

त्यानंतर फडणवीस यांनी सुरु असलेले अधिवेशन जर राज्यपालांच्या निर्देशानुसारच होत असेल तर आधी नियुक्त केलेले हंगामी अध्यक्ष का बदलले? याबाबत प्रश्न उपस्थित केला. जर मागच्या आठवड्यात हंगामी अध्यक्षाची निवड झालेली होती. तर तुम्ही अध्यक्ष का बदलला? तुमच्याकडे १७० आमदारांचे संख्याबळ होते, तर मग तुम्ही अध्यक्ष बदलण्याची घाई का केली?, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले आहे.

मात्र, दिलीप वळसे पाटील यांनी ‘महाविकास’ आघाडीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला होता. तो वाचून दाखविला. तसेच हे अधिवेशन आणि बहुमत चाचणी नियमानुसार होत असल्याचे सांगत बहुमत चाचणी घ्यायला परवानगी दिली.

- Advertisement -

मंत्रीमंडळावर विश्वास असल्याचा ठराव मांडला

त्यानतंर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रीमंडळावर विश्वास असल्याचा ठराव मांडला. त्याला राष्ट्रवादीचे नवाब मलिक, शिवसेनेचे सुनील प्रभू आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी अनुमोदन
दिले.


हेही वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधानसभेतील पहिलं भाषण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -