घरमुंबई'या' मंडळाने साकारला देशासाठी तरुणांच्या पुढाकाराचं महत्त्व सांगणारा देखावा

‘या’ मंडळाने साकारला देशासाठी तरुणांच्या पुढाकाराचं महत्त्व सांगणारा देखावा

Subscribe

'सैन्यदलातील संधी' विषयावर जनजागृती आणि तरुणांनी पुढाकार घेण्याच्या उद्देशातून पालनजी रतनजी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखावा साकारला आहे.

सैन्य म्हणजे फक्त ‘युद्ध’ या पलिकडे सैन्याची काहीच भूमिका नसते, हाच गैरसमज कायम असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना या क्षेत्रापासून लांब ठेवतात. पण, सैन्यातही इंजिनिअर्स, डॉक्टर, संगणकतज्ज्ञ, इलेट्रिशिअन्सचीही आवश्यकता असते. याबद्दल माहिती व्हावी यासाठी ‘कम अ‍ॅन्ड जॉईन नेव्ही अ‍ॅन्ड ओशन ऑफ अपॉर्चिनिटी’ संदर्भात ‘सैन्यदलातील संधी’ विषयावर जनजागृती आणि तरुणांनी पुढाकार घेण्याच्या उद्देशातून पालनजी रतनजी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखावा साकारला आहे.

this ganesh mandal decoration highlights the importance of youth initiative for the country १

- Advertisement -

हेही वाचा – रक्तदानासोबत प्लेटलेट्स दानासाठी जनजागृती देखावा

असा साकारला देखावा

सैन्यदल तरुणाईची वाट बघत आहे. त्यामुळे तरुणाईने पुढाकार घेण्याचीच गरज असल्याचे देखाव्यात साकारण्यात आले आहे. तरुणांना देशप्रमाचे धडे देणार्‍या वीरमाता अनुराधा गोरे, संरक्षणदलात कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांचे मार्गदर्शन, लक्ष फाऊंडेशनच्या अनुराधा प्रभूदेसाई, नाशिकमध्ये सैनिकी प्रशिक्षणाचा प्रसार करणारे कर्नल देशपांडे, तरुणींसाठी आर्मी सर्विसेस आणि सेल्फ डिफेन्सच्या कार्यशाळा घेणार्‍या मीनल वाघ यांसारख्या दिग्गज मंडळींची माहिती आणि त्यांनी केलेल्या कार्याबाबतचा आढावा देखाव्यात साकारण्यात आला आहे.

लहानपणी खोटी बंदूक घेऊन अनेकदा लढाया केलेल्या तरुणांना वेळ आल्यावर कुंटुंबाकडून अजूनही हवा तसा पाठिंबा मिळत नाही. पण, सर्वांनी दहशतवाद, पुंडशाही, गुन्हेदारी रोखण्यासाठी सैन्यदलात भरती व्हावे. आणि यंदाच्या गणेशोत्सवात देशासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी प्रत्येकानेच स्विकारण्यासाठी अशा पद्धतीचा देखावा साकारण्यात आला आहे.
धनंजय बरदाडे, मंडळाचे अध्यक्ष आणि संकल्पना प्रमुख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -