घरमुंबईलॉकडाऊन अगोदरच तंबाखू, सुपारीची चढ्या भावाने विक्री

लॉकडाऊन अगोदरच तंबाखू, सुपारीची चढ्या भावाने विक्री

Subscribe

लॉकडाऊन लागलेला नसताना ही परिस्थिती असल्यास लॉकडाऊन काळात आणखीन किती चढ्या दराने सुपारी, पाने, तंबाखू यांची विक्री होणार? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने राज्यभरात १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच मुंबईत खायची सुपारी, पाने, तंबाखू यांचे दर गगनाला भिडले आहेत. काही लबाड व्यापारी तंबाखूचे दर ५०% जास्त, सुपारी (कच्ची) दुप्पट दर, पाने दुप्पट दरात विकत आहेत. असाच प्रकार गेल्या वर्षी लॉकडाऊन लागला त्यावेळीही घडला होता. तंबाखू चार पट जादा दराने, सुपारी आणि खायची पाने दुप्पट दराने विकूनकाही लबाड व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची कमाई केली. मानखुर्द येथे अशाप्रकारे तंबाखू, सुपारी व पाने यांचा काळाबाजार करून लाखो रुपये कमावलेल्या एका व्यापाऱ्यावर धाड पडली व त्याला ४९ लाख रुपयांच्या कमाईसह बेड्या ठोकण्यात आल्या, तेव्हा तो गंभीर प्रकार उघडकीस आला होता.

आता पुन्हा लॉकडाऊनच्या आधी काळाबाजार सुरू झाला आहे. मुंबई, कुर्ला, मानखुर्द, घाटकोपर, धारावी, सायन अशा अनेक ठिकाणी तंबाखू, सुपारी, खायची पाने, कात , चुना यांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येते. कुर्ला येथे स्टेशन रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाने, सुपारी, कात, तंबाखू यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. याच ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी तंबाखू, सुपारी, कात, चुना यांचा साठा करून ठेवला आहे. स्टेशन रोड परिसरात काही तरुण मुले लोकांना हेरतात व त्यांना गुपचूप आवाज देऊन सुपारी, तंबाखू पाहिजे का? अशी विचारणा करतात.

- Advertisement -

गरजू व्यक्तीने होकार देताच लगेच ती तरुण मुले ग्राहकाला बाजूच्या गल्लीत घेऊन जातात. तेथे एका चपलेच्या गोदामात तंबाखू, सुपारी, कात, ओम पुडी यांचा मोठा साठा करून ठेवण्यात आलेला असून बुधवारी लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच काही तासात या व्यापाऱ्यांनी काळी कमाई मोठ्या प्रमाणात केल्याचे सूत्रांकडून समजते.

या ठिकाणी जी पंढरपुरी तंबाखू ७० रुपये पाव किलो भावाने विकली जाते, ती १०० रुपये पाव किलो; कच्ची अर्ध्या खांडाची सुपारी १३० रुपये पाव किलो विकली जात होती, ती आता २५० रुपये पाव किलो; खायची पाने १० रुपयांना २५ विकली जात होती, त्यासाठी आता २० रुपये मोजावे लागत आहेत. ओम तंबाखू पुडी छापील किंमत ६ रुपये असताना त्या पुडीचे १० रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे लॉकडाऊन लागलेला नसताना ही परिस्थिती असल्यास लॉकडाऊन काळात आणखीन किती चढ्या दराने सुपारी, पाने, तंबाखू यांची विक्री होणार? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -