घरताज्या घडामोडीमध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. करीरोड रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. एक एक्स्प्रेस करीरोड स्थानकात थांबलेली असून, त्यापाठीमागे लोकल रखडली आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. करीरोड रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. एक एक्स्प्रेस करीरोड स्थानकात थांबलेली असून, त्यापाठीमागे लोकल रखडली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना लोकल बिघाडाचा सामना करावा लागत आहे. (Traffic disruption on Central Railway fast line Interruption of passengers)

मध्य रेल्वेच्या करीरोड रेल्वे स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अप जलद मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच, दादरहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. एका पाठोपाठ एक लोकल गाड्या उभ्या आहेत.

- Advertisement -

लोकल विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. प्रवाशांची करीरोड रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. गर्दीमुळे प्रवाशांना लोकल पकडण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच, गर्दी झाल्याने प्रवाशांना ऑफिसला लेट मार्कचा सामना करावा लागतो आहे.

करीरोड रेल्वे स्थानकात एक्स्प्रेसचा थांबली असून, तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच रेलवेच्या कर्मचाऱ्यांनी बिघाडास्थळी धाव घेतली आहे. शर्तीच्या प्रयत्नांनी कर्मचारी बिघाड दुरूस्त करण्याचे काम करत आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल सेवा पूर्व पदावर केव्हा येईल याची अद्याप माहिती मिळालेली नाही. त्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे. तसेच, प्रवाशी जलद मार्गावरील लोकलमधून उतरून धीम्या मार्गावरील लोकलमधून प्रवास करत आहेत.

- Advertisement -

सध्या करीरोड रेल्वे स्थानकात जलद मार्गावरील प्रवाशांची गर्दी धीम्या मार्गावरील स्थानकावर वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी धक्काबुक्कीचा त्रास सहन करावा लागत आहे.


हेही वाचा – अधिवेशनाचा तिसरा दिवस; ‘या’ मुद्द्यांवरुन होणार सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -