घरमुंबईरेल्वे तिकीट तपासनीसांचा प्रवास भत्ता बंद

रेल्वे तिकीट तपासनीसांचा प्रवास भत्ता बंद

Subscribe

चार महिन्यांपासून भत्ता नाही ,ऑगस्ट महिन्यापासून आंदोलनाचा इशारा

पश्चिम रेल्वे मार्गावरील उपगरीय लोकल गाड्यांमध्ये काम करणार्‍या तिकीट चेकर यांना गेल्या चार महिन्यापासून प्रवास भत्ता देणे पश्चिम रेल्वेने बंद केले आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात पश्चिम रेल्वेचे सर्व टिसी एकत्र आले आहेत. जर रेल्वेने प्रवास भत्ता बंद करण्यामागील कारणमीमांसा केली नाही, तर ऑगस्ट महिन्यात आंदोलन करण्याचा इशारा टिसींना दिला आहे.

उपनगरी मुंबई लोकल गाड्या व मेल-एक्स्प्रेसमध्येही तिकीट तपासणीचे काम करतात.मुंबईतील टीसी यांना नियोजित मुख्य कार्यालयापासून आठ किलोमीटरपेक्षाही जास्त प्रवास होत असेल तर त्या टिसीला प्रवास भत्ता मिळतो. हा भत्ता टिसींना ग्रेडनुसार दिला जातो. त्यामुळे प्रवासावेळी काम करण्यासही सोप्पे होते. परंतु मार्च ते जून असा चार महिन्यांचा प्रवास भत्ता पश्चिम रेल्वेने टिसींना देणे बंद केले. भत्ता बंद करण्यामागील कारणही न सांगितल्याने त्याचा जाब रेल्वे प्रशासनालाही विचारण्यात आला. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. प्रशासनाच्या या भूमिकेचा विरोध करत प्रवास भत्ता न मिळाल्यास ऑगस्ट महिन्यात आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनने दिला आहे.

- Advertisement -

प्रवास भत्ता याआधी १९८२ साली, त्यानंतर १९८९, २००० सालीही बंद केला होता. परंतु तो पुन्हा सुरू केला. आता फेब्रुवारी २०१९ पासून प्रवास भत्ता देणे पुन्हा बंद केले आहे. टीसी हे १०० टक्के दावा प्रवास भत्तावर करतात. मात्र लेखापरिक्षकाने दिलेल्या नोंदीनुसार टीसींना ७० टक्केच प्रवास भत्ता मिळायला हवा. मात्र तो देण्याऐवजी बंदच करण्यात आला आहे. या महिन्यात तोडगा काढू असे आश्वासन पश्चिम रेल्वेकडून मिळाले आहे. तोडगा निघाला नाही, तर टिसींना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असे सल्याचे मत दैनिक आपल महानगर बरोबर बोलता वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस जे.आर.भोसले यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -