घरताज्या घडामोडीभटक्या श्वानामुळे सख्ख्या बहिणींचा मृत्यू; लाकडी प्लायवुडचा ढिगारा कोसळून दुर्दैवी अंत

भटक्या श्वानामुळे सख्ख्या बहिणींचा मृत्यू; लाकडी प्लायवुडचा ढिगारा कोसळून दुर्दैवी अंत

Subscribe

भटका कुत्रा गोदामात रचलेल्या लाकडी प्लायवुडच्या ढिगाऱ्यावर चढल्यामुळे प्लायवुडचे थर गाढ झोपेत असलेल्या दोन बहिणींच्या अंगावर कोसळून त्यात दोन सख्ख्या बहिणींचा खून झाल्याची घटना घडली आहे.

भटका कुत्रा गोदामात रचलेल्या लाकडी प्लायवुडच्या ढिगाऱ्यावर चढल्यामुळे प्लायवुडचे थर गाढ झोपेत असलेल्या दोन बहिणींच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत दोन्ही बहिणींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी मुंब्रा शीळडायघर परिसरता घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शीळडायघर पोलिसांनी या घटनेप्रकरणी अपमृत्यूची नोंद घेतली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी. जाधव यांनी दिली.

नेमके काय घडले?

मंजू विश्वंभर चौरसिया (९वर्षे), रंजू विश्वंभर चौरसिया (११वर्षे) असे या दुर्घटनेत मृत्युमूखी पडलेल्या दुर्देवी बहिणीची नावे आहेत. मुंब्रा शीळडायघर येथील आचार गल्ली येथे राहणारे विश्वभंर चौरसिया यांचे या परिसरात लाकडी प्लायवुडचे गोदाम आहे. या गोदामातच विश्वंभर चौरसिया हे पत्नी आणि ७ मुली आणि एक मुलगा असे एकूण ८ अपत्यासह राहतात. रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास इतर ८ अपत्यांपैकी मंजू आणि रंजू या दोघी डास चावतात म्हणून प्लायवुडच्या ढिगाऱ्याजवळ धूर करून झोपी गेल्या होत्या. काही अंतरावर विश्वंभर पत्नी आणि इतर मुले जेवायला बसले होते.

- Advertisement -

दरम्यान, बाहेरील एक भटका कुत्रा पावसापासून वाचण्यासाठी गोदामातील प्लायवुडच्या ढिगाऱ्यावर उडी मारून चढल्यामुळे ढिगारा कोसळून झोपी गेलेल्या मंजू आणि रंजू यांच्या अंगावर कोसळून प्लायवुडच्या ढिगाऱ्याखाली दोघी दबल्या गेल्या. विश्वंभरने पतीच्या मदतीने प्लायवुड बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्लायवुड वजनदार असल्यामुळे त्यांना काढता येत नव्हते, अखेर त्यांनी मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना बोलावून प्लायवुड बाजूला केले आणि दोन्ही मुलींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दोघींना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शीळडायघर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या दुर्घटनेप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती शिळडायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी. जाधव यांनी ‘आपलं महानगरला’ दिली.


हेही वाचा – कामाठीपुर्‍यात अनलॉकसाठी ‘लालबत्ती’! हजारो रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -