घरमुंबईभांडुप येथे बांधकाम कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

भांडुप येथे बांधकाम कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Subscribe

भांडुप ( पश्चिम), डंकलाईन रोड, दर्गा रोड कब्रस्तान, क्रांती मिटर मंडळ, साईबाबा मंदिराजवळ डोंगराळ भागात एका व्यावसायिक बंद गाळ्याचे दुरुस्तीचे काम सुरू होते. शनिवारी सदर गाळ्यात पोटमाळ्याचे बांधकाम करण्यात आले. त्यासाठी लोखंडी चॅनलवर लाद्या टाकून रेती, सिमेंटचा स्लॅब टाकण्यात आला होता. सदर बांधकाम ओले होते. त्याच स्लॅबवर ठेकेदाराच्या कामगारांनी रेतीचा साठा व विटा रचून ठेवल्या होत्या.

मुंबईः खिंडीपाडा येथे एका व्यावसायिक गाळ्यामध्ये दुरुस्ती कामाच्या अंतर्गत नव्याने बांधलेल्या पोटमाळ्याचे बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेत राजकुमार राम सहाय (२१) आणि रामवतार अर्जुन यादव (१८) या दोन कामगारांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी पहाटेच्या सुमारास कामगार झोपेत असताना घडली. या दुर्घटनेत बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, भांडुप ( पश्चिम), डंकलाईन रोड, दर्गा रोड कब्रस्तान, क्रांती मिटर मंडळ, साईबाबा मंदिराजवळ डोंगराळ भागात एका व्यावसायिक बंद गाळ्याचे दुरुस्तीचे काम सुरू होते. शनिवारी सदर गाळ्यात पोटमाळ्याचे बांधकाम करण्यात आले. त्यासाठी लोखंडी चॅनलवर लाद्या टाकून रेती, सिमेंटचा स्लॅब टाकण्यात आला होता. सदर बांधकाम ओले होते. त्याच स्लॅबवर ठेकेदाराच्या कामगारांनी रेतीचा साठा व विटा रचून ठेवल्या होत्या.

- Advertisement -

याच गाळ्यात दोन कामगार रात्री  झोपले होते. रविवारी पहाटे ५ – ६ वाजाताच्या सुमारास सदर पोटमाळ्यासाठी घातलेला स्लॅब लोखंडी चॅनल, रेती, विटांच्या साठ्यासह अचानकपणे कोसळला. त्याच्या ढिगाऱ्याखाली झोपेत असलेले दोन कामगार सापडले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. सकाळी ९ वाजताच्या सुमारास जेव्हा बंद गाळ्याचे शटर उघडले असता ही दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले. सदर दोन्ही कामगारांना इतर कामगार व स्थानिकांनी तात्काळ नजीकच्या अगरवाल रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी ते दोन्ही कामगार मृत झाल्याचे घोषित केले. ही घटना का व कशी काय घडली, याबाबत स्थानिक पोलीस, संबंधित पालिका अग्निशमन दलाचे अधिकारी तपास करीत आहेत.

 

- Advertisement -

आमदार रमेश कोरगावकर, शिवसेना, उद्धव ठाकरे गट

व्यवसायिक गाळ्यात पोटमाळ्याचे बांधकाम सुरू असताना १४ फुटांचा स्लॅब अचानक कोसळला. त्यात दोन कामगार अडकले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. घटना का व कशी काय घडली याबाबत अधिक माहिती घेत आहे.


 संगीता गोसावी,स्थानिक माजी नगरसेविका, शिवसेना, ठाकरे गट

खिंडीपाडा – टेंभीपाडा हा डोंगराळ व भाग असून तेथे काही व्यवसायिक गाळे आहेत. या ठिकाणी पोटमाळ्याचे बांधकाम करण्यात आले होते. त्यासाठी टाकण्यात आलेल्या स्लॅबवर रेती व विटा रचून ठेवले होते. पहाटेच्या सुमारास लोखंडी चॅनलसह स्लॅब व रेती आणि विटा हे सर्व कोसळले. त्याच्या ढिगाऱ्याखाली दोन कामगार अडकले. त्यांना उपचारासाठी अगरवाल रुग्णालयात नेण्यात. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -