घरमुंबईटीवायबीकॉमचा निकाल जाहीर, शिक्षणमंत्र्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

टीवायबीकॉमचा निकाल जाहीर, शिक्षणमंत्र्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Subscribe

रविवारी रात्री टीवायबीकॉम परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाने सोमवारी संध्याकाळपर्यंत एकूण ११५ निकाल जाहीर केले आहेत. यात प्रामुख्याने टीवायबीएस्सी सारख्या महत्त्वाच्या निकालांचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठाच्या निकालात गेल्यावर्षी झालेल्या गोंधळामुळे राज्य सरकारसह सर्वांचे लक्ष यंदाच्या निकालाकडे लागले आहे. आतापर्यंत अनेक निकाल जाहीर झाले असले तरी सर्वांचे लक्ष महत्त्वाच्या अशा टीवायबीकॉमच्या निकालावर होते. अखेर रविवारी हा निकाल जाहीर केला असून घोषणेनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. विद्यापीठाने निकालाची घोषणा करताच शिक्षणमंत्र्यांनी सोमवारी या घोषणेबद्दल ट्विटरवरुन विद्यापीठाची पाठ थोपटली.

विद्यापीठाकडून आतापर्यंत ११५ निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे गेल्यावर्षी निकालासाठी तब्बल सहा ते सात महिने वाट पहावी लागली. निकालाअभावी अनेकांचे शैक्षणिक भवितव्यदेखील पणाला लागले होते. या निकाल गोंधळामुळे मुंबई विद्यापीठाबरोबरच राज्य सरकारवरदेखील टीकेची झोड उठविण्यात आली होती. विरोधकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही लक्ष्य केले होते. त्यातच विद्यापीठाने यंदाही पेपर तपासणीसाठी ऑनलाईन मूल्याकंन कायम ठेवल्याने निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाने अनेक निकालांची घोषणा केली असून रविवारी रात्री टीवायबीकॉम परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाने सोमवारी संध्याकाळपर्यंत एकूण ११५ निकाल जाहीर केले आहेत. यात प्रामुख्याने टीवायबीएस्सी सारख्या महत्त्वाच्या निकालांचा समावेश आहे.

- Advertisement -

शिक्षणमंत्र्यांनी ट्विटरवरुन केले कौतुक

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या अनेक महत्त्वाच्या अभ्यासक्रमांपैकी टीवायबीकॉम हा महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. यात सुमारे ७४ हजार विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने वेळेत जाहीर केल्याने विद्यापीठावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात प्रामुख्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठाची पाठ थोपटली असून सोमवारी सकाळीच त्यांनी टीवायबीकॉमचा निकाल जाहीर केल्याची माहिती त्यांच्या ट्विटरवरुन दिली. तर वेळेत निकाल जाहीर केल्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, अशी पुष्टी देखील त्यांनी यावेळी जोडली. महत्त्वाचे निकाल जाहीर झाले आहेत. विरोधकांना टीकेची संधी मिळू नये, यासाठीच त्यांनी ट्विट केल्याची चर्चा दिवसभर विद्यापीठात रंगली होती.

६९.३१ टक्के लागला निकाल

दरम्यान, रविवारी रात्री जाहीर केलेल्या निकालात यंदा टीवायबीकॉमचा निकाल ६९.३१ टक्के लागल्याचे परीक्षा व मूल्यमापन विभागाने जाहीर केले आहे. एकूण ७३ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १९ हजार ८४८ विद्यार्थी नापास झाले आहेत.

- Advertisement -

शिक्षणमंत्र्यांची घाई कशासाठी

मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या कामगिरीवरुन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कौतुक केले असले तरी विरोधकांनी मात्र विद्यापीठावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठविली आहे. विद्यापीठाने आतापर्यंत ११५ निकाल जाहीर केले असले तरी एकूण ४०२ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत. त्यामुळे अद्याप २५० हून अधिक निकाल बाकी आहेत. अजून बराच पल्ला गाठायचा असून हे निकाल देखील वेळेत जाहीर होणे बाकी असताना तावडे यांनी घाईने ट्विट केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. अमोल मातेले यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -