राजभवनात राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते उदय लळीत यांचा सत्कार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित

राजभवनातील दरबार हॉल मध्ये सरन्यायाधीशांच्या सत्कार समारंभ झाला राज्याचे राजपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उदय लळीत यांचा सत्कार करण्यात आला.

मुंबईतील राजभन येथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उद्या लळीत यांचा सत्कार समारंभ सोहळा झाला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagatsingh koshyari) उपस्थित होते. राजभवनातील दरबार हॉल मध्ये सरन्यायाधीशांच्या सत्कार समारंभ झाला राज्याचे राजपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उदय लळीत (uday lalit) यांचा सत्कार करण्यात आला. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

राजभानात उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उदय लळीत यांच्या कार्यबद्दल गौरव पात्रात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अभ्यासू आणि ज्ञानी वकील म्हणून उदय लळीत यांची दिल्लीत प्रतिमा तयार झाली. तटस्थ राहून न्यायदानाच्या दृष्टीकोनातून कोर्टाला कोण मदत करू शकत असा प्रश्न उपस्थित व्हायचा तेव्हा उदय लळीत यांचे नाव प्रमुख्याने समोर यायचे असं देवेंद्र फडणवीस (dcm devdenra fadnavis) म्हणाले.

उदय लळीत यांनी कोर्टाच्या अनेक महत्वाच्या केसेस मध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली. न्यायमूर्ती म्हणून उदय लळीत यांनी मोठे योगदान दिले आहे. उदय लळीत सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती झाले, निष्णांत वकील झाले पण या सगळ्यात लळीत त्यांची नम्रता आपल्या सर्वांनाच पाहायला मिळाली. असं म्हणत फडणवीसांनी उदय लळीत यांचे कौतुक केले. दरम्यान उदय लळीत यांच्याकडून नेहमीच सर्वांना मार्गदर्शन मिळाले असा विश्वास सुद्धा फडणवीसांनी व्यक्त केला.

उदय ललित यांनी जे योयदान दिले ते अत्यंत्य महत्वाचे आहे. त्यामूळेच न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये परिवर्तन सुद्धा पाहायला मिळतं. ज्यावेळी मी सर्वांचा आढावा घेतो तेव्हा असं जाणवतं की आपल्या समोर खूप आव्हानं आहेत त्यामूळेच न्यायदानाची प्रक्रिया आणखी वेगवान कशी करता येईल याकडेही आमचा नेहमीच कल असतो. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हे ही वाचा – शालेय पोषण आहाराचे नामकरण; हे आहे नवं नाव