घरमुंबई...तर मिशी आणि भुवया छाटून टाकीन - उदयनराजे भोसले

…तर मिशी आणि भुवया छाटून टाकीन – उदयनराजे भोसले

Subscribe

निवडणूक घेतल्यानंतर नक्कीच फरक दिसला नाही तर मिशा नाहीतर भुवया काढून टाकेन असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हिएम मशीनच्या मुद्द्यावरुन मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनमुळे मतदानाच्या आकडेवारीमध्ये फरक झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘माझ्या मतदार संघात पुन्हा निवडणूक घ्या. खर्च मी करतो. माझे निवडणूक आयुक्तांना चॅलेंज आहे. ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही व्हायरस होऊ शकतो. निवडणूक घेतल्यानंतर नक्कीच फरक दिसला नाही तर मिशा नाहीतर भुवया काढून टाकेन असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

ईव्हीएम मशीन कम्प्युटरपेक्षा भारी नाही

साताऱ्यामध्ये पुन्हा निवडणूक घ्या त्यासाठीचा खर्च मी करतो. जर मी हारलो तर मिशा आणि भुवया काढून टाकले. मी भान ठेवून बोलतोय. आज आपल्याला आपलीच शाश्वती नाही. विज्ञान खूप पुढे गेले आहे. ईव्हीएम मशीन काय फार पुढे नाही. ईव्हीएम काही कम्प्युटरपेक्षा अधिक भारी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ह्यूमन एरर कोणत्याही मशिनमध्ये असतो. मात्र ब्यालेट पेपरवर एरर येत नाही. दरम्यान, न्याय व्यवस्था आणि सगळ्यांबद्दल मला आदर आहे. पण या मशीनवर वकील किंवा इतर कोणी भाष्य करू शकत नाही. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर यावर सांगू शकतो, करण यंत्र त्याला ठाऊक असते. आज या यंत्रकडे मी दोन बाजूने पाहतो. सोशल, इकोनॉमिक आणि दुसरं टॅक्स पेडच्या दृष्टिकोनातून मी त्याकडे पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ईव्हीएम मशीनमुळे मतांमध्ये फरक

एका वेबसाईटने मतदान झालेलं आणि मतमोजणी केल्यानंतर आलेले मतांची बेरीज केली असता तफावत आढळली होती. मी रडीचा डाव खेळत नाही. मी जे जे बोलतो ते खरं बोलतो. निवडून आलोच. आज माझं चॅलेंज आहे स्वीकारा. पुन्हा निवडणुक लावा बॅलेट पेपरवर, अशी मागणी त्यांन केली आहे. एक ईव्हीएम मशीन ३३ हजार रुपयांचे आणि पत्र्याचे डबडं (बॅलेट पेपर) फक्त ३३० रुपयांचे आहे. जवळपास ५ हजार कोटी या ईव्हीएम मशीनवर वायफळ खर्च केला जातो आणि ज्यामध्ये मतांमध्ये फरक येतो.

माझ्या मतांवर चर्चा घडवून आणा

मी उगाच तोंडाच्या वाफा करत नाही तर मी खरं बोलतोय. मी आजही सांगतोय राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त माझं चॅलेंज स्विकारावं. पराभव होऊन बोललो असतो ठीक होतं, पण निवडून येऊन बोलतोय. आज छाती ठोक पणे सांगतो ही लोकशाही किती दिवस टिकणार, किती वेळ तुकडे व्हायला लागतो. सगळ्या लोकप्रतिनिधींना आज सामान्य माणूस म्हणून विंनती करतो. जे माझं मी मत व्यक्त करतोय यावर चर्चा घडवून आणा, अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे.

- Advertisement -

म्हणून लोकशाही संपुष्टात येईल

ईव्हीएम मशीनमुळे देशाचं भविष्य धोक्यात असल्याचे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा सांगितलं होतं. ईव्हीएम राहिलं तर लोकशाही संपुष्टात येईल. आपण प्रत्येक गोष्टींचं सोंग करु शकतो मात्र पैशाचं सोंग नाही घेऊ शकत असे उदयनराजे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -