घरमुंबईकेंद्राने सहकार्य न केल्यास ३ दिवसात लसीकरण बंद!

केंद्राने सहकार्य न केल्यास ३ दिवसात लसीकरण बंद!

Subscribe

राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले असून दिवसाला ५० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे सध्या जास्तीत जास्त कोरोना लसीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र, अशा परिस्थितीत राज्यात कोरोना लसीचा तुटवडा भासत आहे. सध्या राज्याकडे १४ लाख लस उपलब्ध असून या फक्त तीन दिवसांसाठी पुरतील एवढ्या आहेत.

त्यामुळे जर केंद्राने महाराष्ट्राला लवकरात लवकर लस पुरवठा केला नाही तर तीन दिवसात लसीकरण बंद पडेल, अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. रोज सहा लाख लसीकरण करण्याचे केंद्राचे आव्हान पूर्ण करण्याच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे. पण, आता राज्याकडे फक्त १४ लाख लसीचा साठा आहे. पाच लाखांच्या दृष्टीकोनातून हा साठा फक्त तीन दिवसांपुरताच आहे. सध्या केंद्रावर लोक येतायत आणि त्यांना लस आली नाही आहे, तू घरी जा, अशी सांगण्याची वेळ राज्यावर आली आहे. त्यामुळे केंद्राने लस पुरवठ्याचे काम वेगाने करा, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली आहे.

- Advertisement -

देशभरात महाराष्ट्र लसीकरणात अव्वल स्थानावर आहे. पण आता महाराष्ट्राकडे लसीचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्राने येथे जास्त लक्ष दिले पाहिजे. लसीचे डोस नसल्यामुळे राज्यातील काही ठिकाणी लसीकरण थांबवले गेले आहे. त्यामुळे केंद्राकडून ज्याप्रमाणे आव्हानात्मक बोलले जाते, त्याप्रमाणे केले जात नाही. पण आता महाराष्ट्राची परिस्थिती पाहता केंद्राने आठवड्याला किमान ४० लाख लसींचा पुरवठा करावा. जेणेकरून दररोज सहा लाख लोकांना लस देण्याचे धैर्य पूर्ण करता येईल, असे टोपे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -