घरCORONA UPDATEVaccination: लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करताना सावध! नवी मुंबई पोलिसांनी दिल्या खास टिप्स

Vaccination: लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करताना सावध! नवी मुंबई पोलिसांनी दिल्या खास टिप्स

Subscribe

नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी सांगितल्या काही खास टिप्स

राज्यासह देशात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसी घेण्यासाठी आधी कोविन अँप किंवा कोविन पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागते. मात्र कोविनमधील तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन व ओटीपी येण्यात वेळ लागतो. त्यामुळे नागरिक रजिस्ट्रेशन करु शकत नाहीत. त्याचप्रमाणे लसीच्या अपॉइंटमेंट बुकींगमध्येही गोंधळ असल्याचे दिसून आले आहे. या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन वेगवेगळ्या अँप्स,वेबसाइट्स आणि मेसेजमधून बनावट लसीची नोंदणी केली जात आहे. लसीची नोंदणी झाल्याचे sms करुन सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात लसीकरण केंद्रावर लस मिळत नाही. असे अनेक प्रकार सातत्याने समोर येत आहेत.

लसीच्या रजिस्ट्रेशनमधील बनावट अँपचे आजवर अनेक जण बळी पडले आहे. त्याचबरोबर कोणताही फॉरवर्ड मेसेज खात्री न करता पुढे ढकलण्यात येतो. यामुळे लसीविषयी आणि लसीच्या रजिस्ट्रेशनची खोटी माहिती पसरवण्यात येत आहे. हि फसवणूक टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. जेणेकरुन अँप्स आणि खोट्या मेसेजला बळी पडून नागरिकांची फसवणूक होणार नाही. काय आहेत त्या टिप्स जाणून घ्या.

- Advertisement -

बनावट अँप्स टाळण्यासाठी खास टिप्स

  • मोबाईलवर आलेल्या कोणत्याही संशयित,अनोळखी लिंकवर क्लिक करुन नका त्याचबरोबर डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करु नका.
  • लसीकरणाविषयी खोटी माहिती देणारे कॉल्स रिसिव्ह करु नका. त्याचप्रमाणे लसीसाठी रजिस्ट्रेशन करुन देणाऱ्या कोणतेही अनोळखी कॉल्स, मेसेज,ईमेलला बळी पडू नका.
  • सोशल मीडियावर आलेला कोणताही मेसेज किंवा माहिती खरी आहे का हे पडताळून पाहिल्याशिवाय पुढे फॉरवर्ड करु नका.
  • लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करताना कोणात्याही बनावट अँपचा वापर करुन नका. सरकारने तयार केलेल्या लसीकरण नोंदणीसाठीच्या अधिकृत वेबसाइटचाच वापर करा.

    हेही वाचा – कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या Antigen टेस्टला अखेर अमेरिकन CDC कडून मान्यता

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -