घरक्रीडावेरॉक अकादमीला जेतेपद; ओम भाबड सर्वोत्तम खेळाडू

वेरॉक अकादमीला जेतेपद; ओम भाबड सर्वोत्तम खेळाडू

Subscribe

कॅप्टन शंकरराव देशमुख चषक क्रिकेट

ओम भाबडच्या (४१ धावा आणि ४ विकेट) अष्टपैलू खेळामुळे पुण्याच्या वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीने मुंबईच्या दिलीप वेंगसरकर फौंडेशन संघावर २० धावांनी मात करत कॅप्टन शंकरराव देशमुख चषक (१४ वर्षाखालील) क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचेच लक्ष वेधून घेणार्‍या ओम भाबडला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम गोलंदाज तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू (१२७ धावा आणि १० विकेट) असे पुरस्कार मिळाले. या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून अनुराग कवडे (१६० धावा) तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून वेरोकच्या सिद्धार्थ मोहितेची निवड करण्यात आली. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, निवृत्त कॅप्टन शंकरराव देशमुख, रणजीपटू रवी ठाकर, राजू शिर्के आणि मृदुल चक्रवर्ती यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

अंतिम सामन्यात वेरॉक वेंगसरकर अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २५ षटकांत सर्वबाद १२२ धावाच केल्या. त्यांच्या वैभव अगम (२८), ओम भाबड (४१) आणि यश्वीत साई (२३) यांनी चांगली फलंदाजी केली. वेंगसरकर फौंडेशन संघाकडून डावखुरा फिरकी गोलंदाज चिराग मोडक (३ विकेट) आणि सिद्धांत मोहिले यांनी अप्रतिम गोलंदाजी केली.

- Advertisement -

अवघ्या १२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हर्ष गिरकर (२८) वगळता वेंगसरकर फौंडेशनच्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांना निर्धारित २५ षटकांत ९ बाद १०२ धावाच करता आल्या आणि त्यांनी हा सामना २० धावांनी गमावला. ओम भाबडने फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीतही आपली कमाल दाखवत १२ धावांतच ४ विकेट घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -