घरमुंबईVideo : मालाडमधील 21 मजली इमारतीमध्ये भीषण आग; बाल्कनीतून उडी मारत तरुणीने...

Video : मालाडमधील 21 मजली इमारतीमध्ये भीषण आग; बाल्कनीतून उडी मारत तरुणीने वाचावला जीव

Subscribe

मुंबई -: मालाड (प.) येथील २१ मजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी, एक तरुणी गॅलरीमधून बाहेर आली. मात्र ती तिथेच अडकली. काही रहिवाशांनी तिला वाचविण्यासाठी उंच शिडी लावली मात्र तिला त्यावरून नीटपणे उतरणे शक्य न झाल्याने अखेर तिने खाली उडी मारून मोठे धाडस दाखवत स्वतःचा जीव वाचवला. मात्र त्यामुळे ती काही प्रमाणात जखमी झाली.

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार, मालाड (पश्चिम), जनकल्याण नगर, येथील मरिना इन्कलेव्ह या तळमजला अधिक २१ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये शनिवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी, सदर फ्लॅटच्या गॅलरी, खिडकीमधून मोठ्या प्रमाणात आगीसोबतच काळा धूर बाहेर पडत होता. आगीच्या ज्वाला वरील मजल्यापर्यंत पोहोचत होत्या. तर आगीमुळे निर्माण झालेल्या काळ्या धुराने २१ वा मजला गाठल्याचे निदर्शनास आले.

आग व काळा धूर पाहता साहजिकच इमारत व परिसरात मोठी खळबळ उडाली. इमारतीसमोर आगीची घटना बघण्यासाठी नागरिकांची गर्दी जमा झाली होती. सदर इमारतीमधील काही रहिवाशांनी तात्काळ इमारतीबाहेर धाव घेऊन सुरक्षित जागा गाठली. या आगीच्या प्रसंगी एक तरुणी आपला जीव वाचविण्यासाठी गॅलरीमधून बाहेर आली. मात्र तिला तेथून खाली उतरणे शक्य न झाल्याने ती त्याच ठिकाणी अडकून पडली होती. त्यावेळी काही नागरिकांनी तिला सुरक्षतपणे उतरविण्यासाठी उंच शिडी आणली. मात्र त्या शिडीवरून तिला निटपणे खाली उतरणे न जमल्याने तिने त्या शिडीवरूनच खाली उडी मारली व स्वतःचा जीव वाचविला. मात्र ती जखमी झाली.

- Advertisement -

या आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या आगीवर काही कालावधीतच नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र आगीमुळे फ्लॅटमधील काही सामान जळाले व फ्लॅट मालकाची वित्तीय हानी झाली. सदर आग का व कशी काय लागली, याबाबत स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान अधिक चौकशी करीत आहेत.

सुदैवाने जिवीत हानी झाली नाही -: माजी उप महापौर

सदर आगीच्या ठिकाणी एक तरुणी अडकली होती. तिच्या मदतीला रहिवाशी धावून गेले. तिला शिडीच्या आधारे सुखरूप वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिने शिडीवरून उतरताना खाली उडी मारली. त्यात ती किरकोळ जखमी झाली, अशी माहिती माजी उप महापौर सुहास वाडकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.


मुंबईतील सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -