घरमुंबईपवार-राज यांना एकत्र आणण्यास मदत करेन

पवार-राज यांना एकत्र आणण्यास मदत करेन

Subscribe

तेजल गावडे

नाट्यसंमेलनात तावडेंचा टोला

- Advertisement -

सामर्थ्यवान विरोधी पक्षासाठी जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना एकत्रित आणण्यासाठी माझी गरज लागणार असेल तर त्यांनी तसे आवर्जून सांगावे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे म्हणाले,
९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिर येथे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांचे हे विधान खरेच सल्ला आहे की, विरोधकांना टोला आहे, यावर नाट्य संमेलनात बराच वेळ खमंग चर्चा रंगली होती.
सत्ताधारी पक्षासमोर जर चांगला विरोधी पक्ष असेल तर सत्तेत चांगले काम करता येते. आम्हाला पुढील पाच दहा वर्षे सत्तेत चांगले काम करायचे आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र आणल्यामुळे विरोधी पक्ष बळकट होणार असेल तर राज्यहितासाठी हे सुद्धा करायला तयार आहे, असे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
नाट्य अनुदान, नाट्यगृहांच्या स्थितीविषयी तावडे यांनी मान्यवरांशी चर्चा केली. ते म्हणाले, २५ जुलैला सुधीर फडके यांची जन्मशताब्दी, १० ऑक्टोबर ग. दी. माडगुळकर यांची जन्मशताब्दी आणि ८ नोव्हेंबर पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जन्मशताब्दी समारोह समिती स्थापन करून येत्या वर्षभरात मोठ्या कार्यक्रमासोबत तालुका पातळीवर अभिनयाविषयी शंभर कार्यशाळा घेण्याचा विचार आहे. या कार्यशाळेमुळे चांगले कलाकार घडतील. आगळेवेगळे कार्यक्रम केले जातील, असेही तावडे यांनी सांगितले.

रंगली सांस्कृतिक आबादुबी

- Advertisement -

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात दुसèया दिवशी सांस्कृतिक आबादुबी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात जितेंद्र जोशी, प्रियदर्शन जाधव, केदार शिंदे, चिन्मय मांडलेकर, ह्रषिकेश जोशी, प्राजक्त देशमुख, अद्वैत दादरकर, संतोष पवार, देवेंद्र पेम, प्रताप फड ही मंडळी सहभागी झाली होती. या परिसंवादात नाटकाशी निगडित विविध बाबी आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली.
या परिसंवादाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. निर्माते दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, नाट्य सेन्सॉर बोर्डातील दहा लोकांपैकी सहा लोकांना तरी नाटक काय आहे ते समजायला हवे. नाटकाच्या सरावासाठी चांगली जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, असे अभिनेता ह्रषिकेश जोशी म्हणाला. या ह्रषिकेशच्या बोलण्यावर अद्वैत म्हणाला की, तालिमांसाठी सकारात्मक उर्जा देणारी जागा पाहिजे, मग अशा ठिकाणी एसी नसेल तरी चालेल. तो पुढे म्हणाला की, नाटक सेलिब्रिटी सेन्ट्रीक होत चालले आहे. इतर कलाकारांनाही संधी मिळाली पाहिजे. यावर लेखक प्रताप फड म्हणाले की, नाटक केवळ चेहरा चालवत नाही, त्यासाठी अभिनय उत्तम करता आला पाहिजे.
प्रियदर्शन जाधवने नाटकांच्या जाहिराती करण्यापेक्षा प्रमोशनवर भर द्यावा, असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -