घरमुंबई'पाणी नाही तर मत नाही', जोगेश्वरीकरांचा निर्धार!

‘पाणी नाही तर मत नाही’, जोगेश्वरीकरांचा निर्धार!

Subscribe

आपलं महानगरने देखील काही महिन्यांपूर्वी जोगेश्वरीकर पाणीबाणीमुळे त्रस्त असल्याची बातमी छापली होती. मात्र आता ऐन निवडणुकीत ही पाण्याची समस्या आता उमेदवारांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 

उत्तर पश्चिम मतदारसंघ. या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरूपम हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र सध्या या मतदार संघातील मतदारांनी आधी नियमीत पिण्याचे पाणी द्या मगच मत मागा अशी भूमिका घेतली आहे. जोगेश्वरीमतदारसंघातील रहिवासी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून अनियमीत पाण्याच्या पुरवठ्यामुळे पुरते हैराण झाले आहेत. आपलं महानगरने देखील काही महिन्यांपूर्वी जोगेश्वरीकर पाणीबाणीमुळे त्रस्त असल्याची बातमी छापली होती. मात्र आता ऐन निवडणुकीत ही पाण्याची समस्या आता उमेदवारांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

जोगेश्वरीत पाणी प्रश्न कायम

नगरसेवक आमदारांचे दुर्लक्ष 

जोगेश्वरी मतदारसंघातील गोनी नगर, कोकण नगर, शिव टेकडी, दत्त टेकडी, संजय नगर, बांद्रा प्लॉट या भागात गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात पिण्याचे पाणी देखील येथील रहिवाशांना मिळत नसल्याने आता जोवर पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होत नाही तोवर मतदान करणार नाही असा निर्धार ब्रांदा प्लॉट येथील रहिवाशांनी केला आहे. या मतदार संघाचे आमदार राज्यमंत्री रविंद्र वायकर आहेत पण ते पूर्णपणे जोगेश्वरीचा विकास करण्यामध्ये असमर्थ ठरल्याचा आरोप आता जोगेश्वरीकर करू लागले आहेत. नगरसेवक आमदार निवडणुका आली की येतात आणि नंतर गायब होतात असा आरोप या रहिवाशांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. दरम्यान आपलं महानगरच्या चाय पे चर्चा या कार्यक्रमात देखील इथल्या रहिवाशांनी अनियमित होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे आता नोकरी सोडून घरी बसायची वेळ आल्याचे सांगत जे दोन घोट पिण्याचे पाणी देऊ शकत नाहीत ते खासदार होऊन काय करणार असा संतप्त सवाल देखील या रहिवाशानी उपस्थित केला.

पाच मिनिटे देखील आम्हाला पिण्याचे पाणी मिळत नाही. आमदार, नगरसेवक येतात आणि नुसती आश्वासने देऊन जात आहेत. ही पाण्याची समस्या मागील ७ महिन्यांपासून आम्ही सहन करतो. – राणी हरी मुक्ते, रहिवासी

यावेळी आम्ही ठरवले आहे जो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करेल त्यालाच मत द्यायचे नाहीतर मत द्यायचे नाही. आमचे मत फूकट गेले तरी चालेल. – गिता भालेराव, रहिवासी

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -