घरमुंबईमुंबईतील 'या' भागांमध्ये दोन दिवस पाणी पुरवठा असणार बंद

मुंबईतील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस पाणी पुरवठा असणार बंद

Subscribe

जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी आणि बुधवारी मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई महानगरप‍ालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पवईच्या तानसा (पश्चिम) येथील १८०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यासोबतच पाणीपुरवठा विभागाकडून जी/उत्तर विभागातील धारावी येथील माहीम फाटकजवळ १८०० मि.मी. व्यासाची वैतरणा आणि अप्पार वैतरणा जलवाहिनी खंडीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपासून सुरु होणार असून बुधवार १० जुलैला दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु असणार आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी पाणी पुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना पाणी साठवून जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ भागांमधील पुरवठा असणार बंद

जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे मुंबईच्या के/पूर्व विभागातील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअर पोर्ट, एम. आय. डी. सी. ट्रान्स रेसिडेन्सी, सुभाष नगर, सारीपुत नगर, विजय नगर, पोलिस कॅम्पप, मरोळ गांवठाण, मिलिटरी रोड, भवानी नगर, चिमटपाडा, सगबाग, मकवाना रोड, ओम नगर, सहर गांव, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, इस्लातमपुरा, पारसीवाडा, चकाला गांवठाण, जे. बी. नगर, मुळगांव डोंगरी, बामणवाडा, कबीर नगर, लेलेवाडी, टेक्निकल क्षेत्र, तरुण भारत सोसायटी, एअर पोर्ट परिसर या भागांमधील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यासोबतच एच/पूर्व विभागातील वांद्रे टर्मिनस परिसरारात पाणी पुरवठा बंद असणार आहे. जी/उत्तर विभागाच्या धारावी मेन रोड, गणेश मंदीर रोड, ए. के. जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोराकुंभार रोड आणि दिलीप कदम मार्ग या भागांमध्ये मंगळवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर जी/उत्तर विभागाच्या प्रेम नगर, नाईक नगर, ६०’ रोड, जस्मिन मिल रोड, मांटुगा लेबर कॅम्प, ९०’ रोड, एम. जी. रोड, धारावी लुप रोड येथे बुधवारी सकाळी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -