घरमुंबईपश्चिम उपनगरीय परिसरात 'या' भागात मंगळवार आणि बुधवारी पाणी पुरवठा बंद

पश्चिम उपनगरीय परिसरात ‘या’ भागात मंगळवार आणि बुधवारी पाणी पुरवठा बंद

Subscribe

काही भागातील पाणीपुरठा बंद करण्यात येणार. तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

पश्चिम उपनगरिय भागात पुढील दोन पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. अंधेरी, खार ,सांताक्रूझ आणि विलेपार्ले येथील पाणीपुरवठा येत्या मंगळवारी आणि बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. अंधेरी भागातील दोन मुख्य जलवाहिन्याना जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. अंधेरी पूर्वेकडील एन.एस.फडके रिजन्सीनजीक महापालिकेच्या मुख्य जलवाहिनी १ हजार ३५० मिलीमीटर व्यासाची वांद्रे ऑउटलेट जलवाहिनी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पार्ले येथील १२हजार मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरीय भागातील काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

चकाला केबीन येथे असणाऱ्या जलवाहिनीची झडप बदलण्याचे काम महापालिकेने सुरु केले आहे. चकाला केबीनची १ हजार ३५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहीनीवर ९०० मिलीमीटर व्यासाची झडप घालण्यात येणार आहे. जलवाहिन्यांचे हे काम दोन दिवस चालणार आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता या कामाला सुरुवात होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत हे काम सुरु राहिल. त्यामुळे काही भागातील पाणीपुरठा बंद करण्यात येणार. तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

‘या’ भागात राहणार पाणीपुरवठा बंद

पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ पश्चिम, खास पश्चिम, विलेपार्ले, विलेपार्ले पूर्वेकडील विमानतळाचा संपूर्ण परिसर, सहारा मार्ग या भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर एन. एस.फडके मार्ग, ए.के.मार्ग, साईवाडी,तेली गल्ली, वाकोला विभाग, कलिना, सीएसटी मार्ग,सुंदरनगर, डवरीनगर, कलिना गाव या भागातही पाणीपुरवठी बंद ठेवणार आहेत. कोलिव्हरी गाव जांभळीपाडा,शास्रीनगर, वांद्रे पश्चिम, मोगरापाडा, एस व्ही मार्ग, गिलबर्ट हिल, चार बंगला या भागात पुढील दोन पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.


हेही वाचा – बाजारात ५० टक्के निकृष्ट दर्जाचे खाद्य तेल!

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -