Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर नवी मुंबई नवी मुंबईत ३० लाख नागरिकांच्या सुरक्षेसाठी ४८११ पोलिस; पोलिस दलातील ३१८ पदे...

नवी मुंबईत ३० लाख नागरिकांच्या सुरक्षेसाठी ४८११ पोलिस; पोलिस दलातील ३१८ पदे रिक्त

Subscribe

नवी मुंबईची सध्याची अंदाजे लोकसंख्या १५ लाख ४३ हजारावर पोहचली आहे. तर नवी मुंबई, पनवेल आणि उरणची लोकसंख्या धरता सुमारे ३० लाख लोकसंख्या नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात येते. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत नवी मुंबई पोलिसांचे बळ १० टक्के देखील नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असणार्‍या ४ हजार ८११ कर्मचार्‍यांच्या खाद्यांवर सुरक्षेची जबाबदार पडली आहे.

नवी मुंबई: नवी मुंबईची सध्याची अंदाजे लोकसंख्या १५ लाख ४३ हजारावर पोहचली आहे. तर नवी मुंबई, पनवेल आणि उरणची लोकसंख्या धरता सुमारे ३० लाख लोकसंख्या नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात येते. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत नवी मुंबई पोलिसांचे बळ १० टक्के देखील नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असणार्‍या ४ हजार ८११ कर्मचार्‍यांच्या खाद्यांवर सुरक्षेची जबाबदार पडली आहे. नवी मुंबई पोलिस दलात दोन सहाय्यक पोलिस आयुक्तासह ३१८ कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहे. मागील काही वर्षापासून पोलिस कर्मचार्‍यांच्या ताफ्यात वाढ करण्याची ओरड देखील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून करण्यात आली मात्र त्याला गृहखात्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अवघ्या दोन महिन्यापुर्वी नवी मुंबई पोलिस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले मिलिंद भारंबे नवी मुंबई पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्या बरोबरच पोलिसांची कुमक वाढविण्यात कितपत यशस्वी ठरतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सन-२०२२ चा वार्षिक अहवाल सादर करताना शहरात महिला अत्याचार, पोस्को, सोनसाखळी चोरी, सायबर गुन्हयांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी सादर केलेल्या वार्षिक अहवालात नवी मुंबई पोलिस मनुष्यबळ-२०२२ मध्ये पोलिसांच्या रिक्त पदांची माहिती समोर आली आहे.
नवी मुंबई पोलिस दलासाठी मंजुर ५ हजार १२९ पदांपैकी ४ हजार ८११चा ताफा सध्या नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यात पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलिस सहआयुक्त संजय मोहिते, अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश घुर्ये, पोलिस उपायुक्तांमध्ये अमित काळे (गुन्हे शाखा), तिरुपती काकडे (वाहतूक शाखा), संजयकुमार पाटील (मुख्यालय), प्रशांत मोहिते (विशेष शाखा), विवेक पानसरे (परिमंडळ-१) व पंकज डहाणे (परिमंडळ-२) म्हणून कार्यरत आहेत. तर मंजुर सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) ११ पदांपैकी ९ पदांचा कारभार अधिकार्‍यांना देण्यात आला असून दोन रिक्त पदांचा कारभार दोघां अधिकार्‍यांकडे देण्यात आला आहे.

शहरवासियांच्या सुरक्षेवर परिणाम 

- Advertisement -

११ अधिकार्‍यांमध्ये वाशी विभागाचे एसीपी धुळा टेळे, तुर्भेचे गजानन राठोड, पनवेल विभाग भागवत सोनावणे, बंदर विभाग धनाजी क्षीरसागर, गुन्हे शाखा विनायक वस्त, मानवी तस्करी विरोधी युनिटचे शैलेष पासलवार, बिनतारी संदेश विभागाचे एसीपी गिरी ठाकरे काम पाहत असून एसीपी मिलिंद वाघमारे यांच्याकडे अतिक्रमण सोबत प्रशासनाचा तर राहुल गायकवाड यांच्या विशेष शाखेबरोबर वाहतुक शाखेचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.
नवी मुंबई, पनवेल व उरण परिसराची वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबई पोलिसां बळ अधिक तोकडे पडत असल्याने त्याचा परिणाम शहरवासियांच्या सुरक्षेवर झाला असल्याचे निष्पन्न होत आहे.

पदनाम            मंजुर पदे                   कार्यरत पदे               रिक्त पदे
एसीपी                 ११                             ९                       २
पो.निरीक्षक           ८२                            ७७                      ५
सहा.पो.निरी.        १९१                           १७४                     १७
पो.उप.निरी.         २२४                           १७२                    ५२
सहा.उप.निरी.       २८१                           २८०                    ०१
हेड कॉन्स्टेबल      १४८८                         १४८४                    ०४
पो.हवालदार        २८४३                          १९०९                   ९३४

- Advertisement -

नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात सर्वच गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे ही बाब खरी आहे. नवी मुंबई पोलिस दलात कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने गृहमंत्र्यांकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्या मंजुरी नंतरच पोलिस दलातील रिक्त जागा आणि अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध होतील.
-मिलिंद भारंबे, पोलिस उपायुक्त, नवी मुंबई

- Advertisment -