घरनवी मुंबईतळोजे औद्योगिक वसाहतीमधील बत्ती गुल;वीजकर्मचारी संपाचा फटका कारखानदारांना

तळोजे औद्योगिक वसाहतीमधील बत्ती गुल;वीजकर्मचारी संपाचा फटका कारखानदारांना

Subscribe

महावितरणच्या विविध कर्मचारी संघटनांच्यावतीने ७२ तास संपाची हाक देण्यात आली आहे.कर्मचार्‍यांनी घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारी सकाळपासूनच संपाला सुरुवात झाली आहे. ७२ तासांच्या या संपाला सकाळी सुरवात झाली असली तरी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील वीज रात्री एक वाजल्यापासूनच बंद झाली असून, पुढील ७२ तासात वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास कारखानदारांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पनवेल: महावितरणच्या विविध कर्मचारी संघटनांच्यावतीने ७२ तास संपाची हाक देण्यात आली आहे.कर्मचार्‍यांनी घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारी सकाळपासूनच संपाला सुरुवात झाली आहे. ७२ तासांच्या या संपाला सकाळी सुरवात झाली असली तरी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील वीज रात्री एक वाजल्यापासूनच बंद झाली असून, पुढील ७२ तासात वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास कारखानदारांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.जवळपास ९५० लहान मोठे कारखाने असलेल्या तळोजे औद्योगिक वसाहतीमधील वीज पुरवठा मंगळवारी ( ता.३)रात्री पासूनच खंडित झाला आहे.वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली असून,काही कारखानदार जनरेटर च्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनरेटर च्या वापराला देखील मर्यादा असल्याने आणि जनरेटला अतिरिक्त इधनाची गरज भासत असल्याने महावितरण विभागाच्या कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा न निघाल्यास कारखानदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती तळोजा इंडस्ट्रीयलिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

अन्न पदार्थांचा साठा खराब होण्याची शक्यता
तळोजे औद्योगिक वसाहतीमधील बत्ती कायम गुल राहिल्यास कोल्डस्टोरेजमध्ये साठवलेल्या करोडो रुपये किमतीच्या औषधांची आणि खाद्य पदार्थांची नासाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर वसाहतीत अन्न पदार्थ तसेच औषध साठवणूक करण्यासाठी वापरात असलेले जवळपास ५३ कोल्ड स्टोरेज आहेत. या ठिकाणी करोडो रुपयांच्या औषधानचा तसेच अन्न पदार्थांचा साठा आहे. पुढील काही तासात वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास हा साठा खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

 जनरेटर वर तग धरण्याचा प्रयत्न
काही कारखानदार आणि कोल्ड स्टोरेज मालकांनी जनरेटर चा वापर सुरु केला आहे.मात्र जनरेटर चा वापर काही तासांपुरता करता येणे शक्य असून, जनरेटर ला लागणार्‍या अतिरिक्त इधना करता कारखानदारांचे लाखो रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.

कारखान्यांचा खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यावा या मागणी साठी महावीतरण विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला मात्र वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आपण हतबल असल्याचे उत्तर अधिकार्‍यांनी दिले आहे.
– प्रशांत रणवरे,
पदाधिकारी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -