घरनवी मुंबईतुर्भेतील गोवर प्रादुर्भाव प्रतिबंधास यश; बालकांना युद्धपातळीवर लसीकरण

तुर्भेतील गोवर प्रादुर्भाव प्रतिबंधास यश; बालकांना युद्धपातळीवर लसीकरण

Subscribe

बेलापूर:झोपडपट्टी भाग असलेल्या तुर्भे विभागात युद्धपातळीवर बालकांना गोवर प्रतिबंध लसीकरण मोहीम ९२ टक्के राबवली गेल्याने आशियातील दुसर्‍या क्रमांकाच्या झोपडपट्टी भागातून गोवरचा वाढलेला प्रादुर्भाव आटोक्यात येण्यास नवी मुंबई आरोग्य यंत्रणेला यश आले असल्याची माहिती तुर्भे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी दिली. गोवरची लागण होऊन मुंबईत २० बालकांचा अलिकडेच झालेला मृत्यू धक्कादायक असून दरम्यानच्या काळात सर्वत्रच गोवर प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात आला. गोवरमुळे बालकांचा झालेला मृत्यू आणि ५००हुन अधिक बालकांना याची झालेली लागण ही बाब चिंताजनक ठरली. तसेच मुंबई पाठोपाठ मुंब्रा, भिवंडी, मालेगाव, ठाणे ग्रामीण मध्ये गोवरचा शिरकाव झाला होता .त्याचवेळी नवी मुंबईतील विशेषतः झोपडपट्टी बहुल भाग म्हणून ओळख असलेल्या तुर्भे विभागात गोवर साथीचा उद्रेक होऊन २ रुग्ण सापडल्याने शहरात खळबळ उडाली होती.
यापार्श्वभूमीवरयेथील महापालिका प्रशासनाने तुर्भे विभागास गोवर उद्रेक कार्यक्षेत्र म्हणून घोषित करून युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु केले. आयक्त अभिजित बांगर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दाटीवाटीचे आणि अतिजोखमीचे सुमारे १ लाख लोकसंख्या असणार्‍या तुर्भे विभागात गोवर प्रतिबंध उपाययोजना तात्काळ हाती घेण्यात आली.

शून्य ते ५ महिने वयोगट असणार्‍या बालकांना शून्य मात्रा तर ६ महिने ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना अतिरिक्त मात्रा तुर्भे स्टोअर, तुर्भे सिडको वसाहत,तुर्भे गाव आदींसह विविध ७ झोपडपट्टी भागात ९२ टक्के गोवर प्रतिबंध लसीकरण मोहीम राबविण्यात येऊन गोवर प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे.
– डॉ. कैलास गायकवाड,
वैद्यकीय अधिकारी, तुर्भे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -