घरनवी मुंबईरोहित पवारांच भुर्जी पावच टायमिंग चुकत तेव्हा...

रोहित पवारांच भुर्जी पावच टायमिंग चुकत तेव्हा…

Subscribe

अंडा भुर्जी नुसती खाल्लीच नाही तर रोहित पवारांनी अंडा भुर्जीच्या गाडीवर भुर्जी करूनही बघितली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार मंगळवारी नवी मुंबईत आले होते. त्यांनी नवी मुंबईचा दौरा केला. दौरा झाल्यानंतर भुक लागली म्हणून रोहित पवारांनी थेट गाठली भुर्जी पावची गाडी. अंडा भुर्जी नुसती खाल्लीच नाही तर रोहित पवारांनी अंडा भुर्जीच्या गाडीवर भुर्जी करूनही बघितली. अंडा भुर्जी बनवतानाचा व्हिडिओही त्यांनी
ट्विट केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागली. एका ठिकाणी सर्वांनी भुर्जी आर्जीचा आस्वाद घेतला. यावेळी भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्किल पाहून मलाही अंडा भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही. शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला’, असे रोहित पवार यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे.

- Advertisement -

भूक लागलेली असतानाही रोहित पवार यांचा अंडा भुर्जी बनवतानाचा उत्साहाला काही तोड नाही. भुर्जी बनवायची ट्रेनिंग घेताना रोहित पवार दिसत आहेत. अंडा भुर्जी बनवणारा तो युवकही त्यांना नीट समजावून हटके स्टाईलमध्ये भुर्जी बनवायला शिकवतो आहे. मग त्याने शिकवलेल्या हटके स्टाईलमध्ये रोहित पवार कापलेला कांदा टोमॅटो हातात घेऊन गरम तव्यावर टाकून कडक फोडणी देताना दिसत आहेत. पहिला प्रयत्न फसला पण रोहित पवारांचा दुसरा प्रयत्न यशस्वी झाला. भुर्जीवाल्या सारखी भुर्जी बनवता नाही आली पण त्यातून पण बनवण्याचा प्रयत्न केला अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.

- Advertisement -

रोहित पवार सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वी मातृदिना निमित्त आईसाठी बनवलेला स्पेशल चहाचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. आता अंडा भुर्जीचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. रोहित पवार यांनी मंगळवारी नवी मुंबईता दौरा केला. यावेळी त्यांनी APMC मार्केटला भेट दिली. पहाटे चार वाजता ते APMC मार्केटमध्ये पोहचले होते. रोहित पवार यांनी वेळोवेळी त्यांच्या दौऱ्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून देत होते.


हेही वाचा – मुंबई अहमदाबाद महामार्गावर तीन ट्रक पेटले, आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -