घरनवी मुंबईमुकुंद कंपनी ते ऐरोली मार्गावरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट

मुकुंद कंपनी ते ऐरोली मार्गावरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट

Subscribe

ऐरोली रेल्वे स्थानक ते मुकुंद या मार्गावर राजकीय पक्षांनी रिक्षा युनियनची उभारणी करून पैसे गोळा करण्याचा नवा पायंडा पाडला आहे.

ठाणे बेलापूर मार्गावरील ऐरोली ते मुकुंद कंपनी येथे जाणार्‍या रिक्षाचालंकाकडून सध्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर लुट सुरु आहे. ऐरोली रेल्वे स्थानकात असणाऱ्या रिक्षा युनियनकडे दिघ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांकडून १५ रुपयांची आकरणी करुन लुटमार सुरु आहे. तर मुकुंद, कळव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर येऊन १५ ते २० रुपये भाडे आकरणी करून तिथून देखील प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे. या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ऐरोली रेल्वे स्थानक ते मुकुंद या मार्गावर राजकीय पक्षांनी रिक्षा युनियनची उभारणी करून पैसे गोळा करण्याचा नवा पायंडा पाडला आहे. मात्र याकडे आरटीओचे आणि वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत आहे.

रिक्षाच्या भाडेवाढमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. मनमानी पद्धतीने फी वाढ केली असल्यास रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येईल.
– हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

- Advertisement -

ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरातून शेअर रिक्षाचालक प्रत्येकी १५ रुपये प्रवासी भाडे आकरतात. त्यामुळे प्रवासी भाडेवाढीने त्रस्त झाले आहेत. ऐरोली बस डेपो ते मुकुंद कंपनी या मार्गावरुन ऐरोली नाका, ऐरोली स्टेशन, दिघा, मुकुंद कंपनी अशा चार टप्प्यात शेअर रिक्षा धावतात. कळवा आणि विटावा परिसरातील नागरिक थेट ऐरोलीमध्ये येण्यासाठी पर्यायी मार्ग वापरतात. तर ऐरोली येथून दिघा, रामनगरकडे जाण्यासाठी दैंनदिन हाजारो नागरिक या रिक्षाचा आधार घेतात. त्यातच मांईड स्पेस आणि अक्षरा या कंपन्याचे कर्मचारी देखील या रिक्षाचा आधार घेतात. किमान भाडे १० रुपये भाडे नियोजित असताना देखील रिक्षाचालक थेट दिघा आणि मुकुंदकडे जाणार्या प्रवाशांकडून १५ रुपयांची भाडे आकारणी करत आहे. ही भाडे वाढ सीएनजी चे दर वाढल्यामुळे वाढत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.

शेअर रिक्षाचालकांची मनमानी

प्रत्येकी शेअर रुपयांचे भाडे १० रुपये घेतले जाते. तर नियमितपणे ३ प्रवासी घेणे बंधनकारक असताना या मार्गावरील रिक्षाचालक सर्रासपणे ४ ते ५ प्रवासी घेऊन वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत आहे. मात्र आता या रिक्षाचालकांनी ५ रुपयांची वाढ केली असून १५ रूपये आकरणी करण्यास सुरुवात केलेली आहे. रात्रीच्या वेळेला रिक्षाचालक शेअर रिक्षा नसल्याचे कारण सांगत मुकुंद आणि दिघ्याकडे जाणार्या रिक्षाचालकांकडून दुपट्ट भाडे आकारणी करतात. वाशी ते कोपरखैरणे मार्गावर देखील किमान २० ते २५ रुपये भाडे आकारून प्रवाशांची लुटमार सुरु आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

Delhi Weekend Curfew: दिल्लीत वीकेंड लॉकडाऊनची घोषणा, उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -