घरनवी मुंबईनवी मुंबईतील जैन समुदायाची निषेध रॅली; झारखंड सरकारच्या निर्णयाचा करणार निषेध

नवी मुंबईतील जैन समुदायाची निषेध रॅली; झारखंड सरकारच्या निर्णयाचा करणार निषेध

Subscribe

जैन धर्मियांचे झारखंड येथील तीर्थक्षेत्र श्री शत्रुंजय शिखरजी हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात संपुर्ण भारतातील जैन समुदाय आक्रमक झाला असून विविध ठिकाणी सभा, आंदोलने व निषेध मोर्चा काढले जात आहेत. बुधवारी मुंबईतील समस्त जैन समुदायाने एकत्रित येऊन आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर आता येत्या रविवारी,  ८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता वाशी सेक्टर-९ मधील महावीर जिनालय येथून निषेध रॅली नवी मुंबई सकल जैन संघाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे.

नवी मुंबई: जैन धर्मियांचे झारखंड येथील तीर्थक्षेत्र श्री शत्रुंजय शिखरजी हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात संपुर्ण भारतातील जैन समुदाय आक्रमक झाला असून विविध ठिकाणी सभा, आंदोलने व निषेध मोर्चा काढले जात आहेत. बुधवारी मुंबईतील समस्त जैन समुदायाने एकत्रित येऊन आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर आता येत्या रविवारी,  ८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता वाशी सेक्टर-९ मधील महावीर जिनालय येथून निषेध रॅली नवी मुंबई सकल जैन संघाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे.
झारखंड सरकारने नुकताच जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेले श्री शत्रुंजय शिखरजी हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. झारखंड सरकारच्या या निर्णयामुळे जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर जैन धर्मीयांच्या गुजरात मधील पालीताणा येथील तिर्थस्थानाचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी तेथील अतिक्रमणे हटविणे, अनाधिकृतरित्या सुरू असलेल्या खाणी बंद करून या पवित्र भूमीचे रक्षण करणे, येथील प्रथम तिर्थंकर आदीनाथ भगवान यांच्या पादुका खंडीत करणाऱयां विरोधात कारवाई करण्याची मागणी जैन समुदायाने केली आहे. त्यामुळे आपल्या या दोन्ही धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी विविध राज्यांमध्ये जैन समाजाच्या संघटना रस्त्यावर उतरुन झारखंड सरकारचा निषेध करत पर्यटन क्षेत्र घोषित करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -