घरनवी मुंबईपनवेलमधील उद्धव ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; बॅनरवरील फोटोवरुन दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक

पनवेलमधील उद्धव ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; बॅनरवरील फोटोवरुन दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक

Subscribe

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेरवारीस राज्यभरात उत्साहात साजरी होत असतानाच पनवेलमधील उद्धव ठाकरे गटाचा शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे फलकावर फोटो टाकला नाही म्हणून स्व पक्षातील पदाधिकार्‍यालाच भर चौकात चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. या प्रकरणात उद्धव ठाकरे गटातील एका बड्या पदाधिकार्‍याचा मुलगा असून,सेनेच्या युवा संघटनेचा पदाधिकारी देखील असल्याची माहिती मिळाली आहे.

दीपक घरत: पनवेल

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सोमवारी सर्वत्र साजरी करण्यात आली पनवेलमधील कळंबोली वसाहतीत देखील या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजित कार्यक्रम स्थळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहणारे फलक लावण्यात आले होते. यामध्ये सेनेतील पनवेलसह जिल्ह्यामधील वरिष्ठ नेत्यांचे फोटो छापण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील एका वरिष्ठ नेत्याचा फोटो या फलकावर नसल्याने दुखावलेल्या या नेत्याच्या मुलाने कळंबोली वसाहतीमधील पदाधिकार्‍याला याबाबत जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

एकमेकांविरोधात अदखल पात्र तक्रार दाखल
एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत प्रकरण गेल्याने अखेर कार्यक्रम स्थळी उपस्थित वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दोन्हीकडच्या पदाधिकार्‍यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात अदखल पात्र तक्रार दाखल केली असल्याची माहिती देण्यातआलीआहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -