घरनवरात्रौत्सव 2022'एसआरएस' ग्रुपच्या दांडिया-गरबाची धमाल

‘एसआरएस’ ग्रुपच्या दांडिया-गरबाची धमाल

Subscribe

आपलं महानगर, 'माय महानगर मानिनी'चे विशेष आयोजन

नाशिक : हिंदी, मराठी गितांच्या रिमिक्सवर मनसोक्तपणे थिरकणारी पाऊले.. पारंपारिक केडिया- लेहंगा परिधान केलेल्या महिलांचा लयबद्ध नृत्याविष्कार.. गरबा आणि दांडियाचे अनोखे फ्युजन आणि जल्लोषपूर्ण वातावरणात, ‘आंबे मात की जय’ चा निनादणारा जयघोष अशा धमाल वातावरणात एसआरएस महिला ग्रुपच्या वतीने आयोजित दांडिया- डीजे नाईट रंगली. दैनिक आपलं महानगर तसेच ‘माय महानगर’ आणि ‘माय महानगर मालिनी’ यू ट्यूब चॅनलचे या कार्यक्रमास माध्यम प्रायोजकत्व लाभले.

नक्षत्र लॉन्सला झालेल्या या दांडिया, गरबा नाईटमध्ये नृत्याची स्पर्धा देखील आयोजित केली होती. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रा. देवयानी फरांदे, शिवसेनेचे महापालिकेतील माजी गटनेते विलास शिंदे, भाजप पदाधिकारी निखील पवार, कल्याणी संस्थेच्या अध्यक्ष सुनीता मोडक, उधाण ग्रुपचे अध्यक्ष जगदीश बोडके, नाईन न्यूजचे संपादक किशोर बेलसरे, सुनीता चव्हाण, लोबल युनिर्व्हसल क्वीन पूनम बिरारी, विश्वसुंदरी स्पर्धेच्या विजेत्या संगीता खैरनार, मेघा चौधरी, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, शरद उगले आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत एआरएसच्या संयोजिका साधना गिललकर, रोशनी राठी आणि सई संघई यांनी केली. ‘आपलं महानगर’चे निवासी संपादक हेमंत भोसले यांनी यावेळी दांडिया गरबाप्रेमींना शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर सुरु झालेल्या या धमाल दांडिया, गरबा डीजे नाईटचा उपस्थितांनी मनसोक्तपणे नृत्यानंद लुटला. अतिशय तालबद्ध आणि लयबद्ध नृत्य तसेच वैविध्यपूर्ण पारंपारिक पेहराव हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य ठरले. घूमर, भवाई, दांडीया रास, डिस्को गरबा यांसारख्या नृत्यविष्कारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. डीजेच्या साथसंगतीनेही कार्यक्रमास ‘चार चाँद’ लावले. स्पर्धेतील विजेतीला ११ हजार रूपयांची पैठणी जिंकण्याची संधी मिळाली.

- Advertisement -
My महानगर Manini, My महानगर तसेच एसआरएस ग्रुप’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दांडिया-गरबा’

https://www.facebook.com/watch/live/?extid=NS-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=OzUgd7&ref=watch_permalink&v=1046661485995358

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -