घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रप्रश्न सुटला : सटाण्यात लवकरच ट्रॉमा केअर, आरोग्य मंत्र्यांनी दिली मान्यता

प्रश्न सुटला : सटाण्यात लवकरच ट्रॉमा केअर, आरोग्य मंत्र्यांनी दिली मान्यता

Subscribe

माजी आमदार दीपिका चव्हाण यांची माहिती, अपघातग्रस्तांना मिळणार जीवदान

सटाणा तालुक्यातील आरोग्यसेवेची गरज लक्षात घेता सटाणा ट्रामा केअर आणि आदिवासी भागातील महत्वाच्या असलेल्या डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयाला शासनाच्या आरोग्य विभागाने नवीन रुग्णवाहिका मंजूर केल्याने या भागातील जनतेच्या आरोग्य समस्या सुटण्यास मदत होणार आहे. साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील ट्रामा केअर सेंटर व डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेता गेली अनेक दिवस सुसज्ज रुग्णवाहिकेची मागणी होत होती. याबाबत राज्य शासन व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता.

नामपूर ग्रामीण रुग्णालयालाही नवीन रूग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. साक्री-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावर अनेक वेळा अपघात होतात. यावेळी अनेक रूग्णांना पुढील उपचारासाठी मालेगाव अथवा नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलला उपचारासाठी पाठवावे लागते. त्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिकेची गरज आहे. चांगली अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने अनेकदा अपघातातील जखमींना जीव गमवावा लागतो. मात्र, या रुग्णवाहिकेमुळे आता रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. राज्य सरकरच्या आदेशानुसार नाशिक विभागाला पहिल्या टप्यात आलेल्या रुग्णवाहिकांमधून सटाणा ट्रामा केअर व डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयास या रुग्णवाहिका मिळणार आहेत. त्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ यांचे सहकार्य लाभले. एक ते दोन दिवसांत या रुग्णवाहिका रुग्णसेवेत दाखल होतील व याचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य रूग्णांना मिळणार असल्याची माहिती माजी आमदार चव्हाण यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -