घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंगमनेरला वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

संगमनेरला वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Subscribe

वडगावपान शिवारात रस्ता बिबट्या रस्ता ओलांडताना वाहनाने मारली धडक

संगमनेर : तालुक्यातील वडगावपान शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी (दि.३१) रात्री ९ वाजेच्या सुमारास लोणी ते संगमनेर रस्त्यावर घडली. वडगावपान शिवारात रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याला अनोळखी वाहनाची धडक दिली. त्यात बिबट्या जागीच ठार झाला. या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. त्यामुळे वनक्षेत्रपाल आधिकारी एस. एस. माळी, वनरक्षक एस. एम. पारधी, वनरक्षक विठ्ठलसिंग जारवाल, पि.जे पुंड , दत्तात्रय पर्बत यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्याला निंबाळे रोपवाटिकेत आणले.

मंगळवारी (दि.१) सकाळी पशुवैद्यकीय आधिकारी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याने वडगाव पान शिवारात बिबट्याचे वास्तव्य अधोरेखित झाले आहे. त्यामुळे वाहनाच्या धडकेत बिबट्यांचा मृत्यू होवू नये, यासाठी वनविभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -