घरपालघरतब्बल १८४ चालकांचे परवाने तात्पुरते रद्द

तब्बल १८४ चालकांचे परवाने तात्पुरते रद्द

Subscribe

काशिमीरा वाहतूक पोलिसांनी गेल्या १० महिन्यात वारंवार त्याच त्याच चुका करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास १८४ वाहन चालकांचे परवाने तीन महिन्याकरता रद्द करण्यात आले आहेत.

काशिमीरा वाहतूक पोलिसांनी गेल्या १० महिन्यात वारंवार त्याच त्याच चुका करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास १८४ वाहन चालकांचे परवाने तीन महिन्याकरता रद्द करण्यात आले आहेत. वाहतूक पोलीस वाहन चालकांना सुधारण्याची संधी देतात. मात्र मुद्दाम चुका करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकाला वठणीवर आणण्यासाठी त्याचा वाहन परवाना रद्द करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी ८ महिन्यापूर्वी काशिमीरा वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारला होता. पहिल्या दिवसापासून शहरातील वाहतुककोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर वाहन चालकांना शिस्त लागावी व वाहतुकीचे नियम पाळावेत याकरता ते सतत प्रयत्तन करत असतात. बेशिस्तरित्या वाहन चालवणाऱ्या व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांचा परवाना तात्पुरत्या काळासाठी रद्द करण्यास भामे यांनी सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून १८४ जणांचे परवाने तीन महिन्यांसाठी ते रद्द करण्यात आले आहेत.

हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न वापरणे, उलट्या दिशेने वाहन चालवणे अशा मोडणाऱ्या चालकांचे समुदेशन करण्याची वेगळी पद्धतही पोलिसांनी हाती घेतली आहे. वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करतानाच वाहतूक कायद्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यावेळी वाहतूक नियमांशी संबंधित प्रश्नपत्रिका वाहन चालकांना दिली जाते. त्याची उत्तरे पोलिसांना द्यावी लागतात. त्यानंतर माफीनामा लिहून सोडले जाते.

- Advertisement -

कारवाई करणे, लोकांच्या मनात भीती बसवणे हा उद्देश नसून तरुण पिढीने वाहतूक कायद्यांचे, नियमांचे पालन करावे. त्यासाठीच तरुणांना वाहतूक नियमांचे धडे देत असून त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका देखील सोडवून घेत आहोत. त्यामुळे तरुणांमध्ये वाहतूक नियमांचे ज्ञान वाढेल. मात्र समुदेशन करून देखील वारंवार चुका होत राहिल्या तर अशा लोकांना वाहन चालवण्याचा हक्क नाही. याच करता अशा वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याकरता मोटार वाहन विभाग (आरटीओ) कडे पाठवले जाते, अशी माहिती भामे यांनी दिली.

१ जानेवारी २०२१ ते २९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत एकूण १ लाख ३० हजार १७४ केसेस वाहतूक विभागाकडून करण्यात आल्या आहेत. यावेळी ४ कोटी ६ लाख ७७ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विना हेल्मेटच्या ३२ हजार १८६ केसेस करून १ कोटी ६० लाख ९३ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. सायलेंसर मोडीफायच्या ३५३ केसेस करून ३ लाख ५३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ५४ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

पुढचा नंबर जितेंद्र आव्हाडांचा, सोमय्यांकडून ११ घोटाळेबाजांची नावं जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -