घरपालघरधान्य वाटप घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

धान्य वाटप घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

Subscribe

याप्रकरणी त्या दुकानदार व त्यांच्या साथीदार दलालांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर :- भाईंदर पूर्वेला फाटक रोड येथे शासकीय रेशन दुकान क्रमांक ४१- फ- २०७ या दुकानात शासकीय योजनेतील अन्नधान्य गोरगरिब लाभार्थी व कार्ड धारकांना वितरित न-करता ते थेट काळ्या बाजारात विकत असल्याची तक्रार उपनियंत्रक शिधावाटप कार्यालय यांच्या कडून प्राप्त झाली होती.तक्रारीनुसार सहायक शिधावाटप अधिकार्‍यांनी साठे रजिस्टर तपासणी केल्याने त्यात तांदूळ व गहू आणि आनंदाचा शिधा यात घोटाळा करून ते काळया बाजारात विकल्याचे उघड झाले.याप्रकरणी त्या दुकानदार व त्यांच्या साथीदार दलालांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकार्‍यांनी चौकशी केली असता तांदूळ १७ हजार १५९ किलो शासकीय दराप्रमाणे ६ लाख ७२ हजार २९० रुपयांचा व गहू १६ हजार ७०७ किलो शासकीय दरा प्रमाणे ४ लाख ५६ हजार १०१ रुपयांचा आणि आनंदाचा शिधा पाकीट ११४ संच त्याची शासकीय किंमत ३९ हजार ९०० रूपये असा एकूण १६ लाख ६८ हजार २९१ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शासकीय दुकानदार राहुल गौड व कीर्ती बाजार ग्राहक सहकारी संस्थेचे अध्यक्ष व सचिव पदाधिकारी यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३, ७ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -