घरमहाराष्ट्रLoksabha 2024 : शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांना पहिला फटका; रामटेकमधून राजू...

Loksabha 2024 : शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांना पहिला फटका; रामटेकमधून राजू पारवे यांचा अर्ज दाखल

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. शिंदे गटाच्यावतीने आज रामटेकमधून राजू पारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेतील बंडात शिंदे यांना साथ देणाऱ्या 13 खासदारांपैकी पहिला फटका तुमाने यांना बसला असून शिंदे यांच्यासोबतच्या आणखी काही खासदारांना नारळ दिला जाणार आहे. भाजपाच्या दबावामुळे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारीही धोक्यात आली आहे. (Loksabha 2024 Shinde groups first shot at Kripal Tumane Raju Parves application submitted from Ramtech)

हेही वाचा – Navneet Rana : लक्ष्मीच्या हाती कमळ असतेच, नवनीत राणांनी भाजपा पक्षश्रेष्ठींचे मानले आभार

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेत बंड केले. त्यावेळी शिंदे यांना लोकसभेतील शिवसेनेच्या 19 पैकी 13 खासदारांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिंदे यांनी या सर्व खासदारांना लोकसभेची पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असा शब्द दिला होता. मात्र, लोकसभा निवडणूक जाहीर होताच शिंदे यांना भाजपाच्या दबावामुळे उमेदवार बदलण्याची आणि काही ठिकाणी भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) यांच्या गटाला जागा सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

नाशिक लोकसभेच्या जागेवर भाजपा पाठोपाठ अजित पवार गटाने दावा केल्याने नाशिकचे खासदार हेमंत गोडसे अस्वस्थ आहेत. त्यांनी होळीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी शिंदे यांनी नाशिकच्या जागा धनुष्यबाणावर लढली जाईल, असा शब्द दिला होता. मात्र, गेल्या दोन दिवसात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपाने नाशिकच्या जागेवर दावा केला असताना आता राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार म्हणून छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात भाजपा नाशिकची जागा अजित पवार गटाला सोडणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीविषयी कमालीची अनिश्चितता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Amravti Lok Sabha : नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार, भाजपाची सातवी यादी जाहीर

महायुतीत शिवसेनेच्या उमेदवार निश्चितीवर भाजपाचा प्रभाव असल्याची कुजबुज ऐकू येऊ लागली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे खासदार धास्तावले आहेत. महायुतीत भाजपा आणि अजित पवार गटाने काही जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. मात्र, शिंदे गटाकडून अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिंदे गटाकडून येत्या काही दिवसात उमेदवारांची घोषणा अपेक्षित असून त्यानंतरच महायुतीत शिंदे गटाला नेमक्या किती जागा आल्या हे स्पष्ट होऊ शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -