Eco friendly bappa Competition
घर पालघर माजी नगरसेवकांच्या बारवर कारवाई

माजी नगरसेवकांच्या बारवर कारवाई

Subscribe

सदरील प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात ११ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर :- भाजपचे माजी नगरसेवक गणेश शेट्टी यांच्या भाईंदर पूर्व मधील अण्णा पॅलेस ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालविणार्‍या आस्थापणावर मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास कारवाई करण्यात आली.मीरा -भाईंदरचे पोलीस उपआयुक्त जयंत बजबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून ४ महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर सदर कारवाईत पोलिसांकडून २४ हजार १३० रुपये जपत करण्यात आले आहेत. सदरील प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात ११ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारच्या हॉलमध्ये महिला सिंगरच्या नावाखाली डान्स बार चालू होता.तसेच बारचे चालक – मालक, कॅशिअर, स्टीवर्ड, पुरुष सिंगर, वादक व वेटर हे मुलींना नृत्य करण्यास प्रोत्साहित करून नृत्य करण्यास भाग पाडत होते. बारमध्ये हिंदी गाण्याच्या व वाद्याच्या तालावर महिला सिंगर अश्लिल नृत्य करत असल्याचे निदर्शनास आले. बारमधील महिला सिंगर यांना अश्लिल नृत्य करण्यास बंदी ते त्याच्या उलट करत होते. यावेळी दिपक पुजारी, रघु उर्फ रॉबिन जान्सन, संजय पाणी, विशालकुमार केसरी, बलराम पासवान, अर्जुन राम, अमरजीत गुप्ता, कन्हेया पासवान, रुपेशकुमार यादव व यादव कोरगा आणि मिथुन वाडेकर आणि चालक मालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

मद्य परवाना झाला होता रद्द

यापूर्वी ऑर्केस्ट्रा बारवर तोडक कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी बारचा मद्य परवाना रद्द करण्यात आला होता. पण त्यांना डान्सबार सुरू करणार नाही या अटीवर पुन्हा देण्यात आला. मुळात सदरील ऑर्केस्ट्रा बार हा पालिकेकडून अनधिकृत सुद्धा घोषित करण्यात आला आहे. तरीही त्याठिकाणी बेकायदेशीर धंदे सुरू असल्याने याला स्थानिक पोलिसांची हातमिळवणी होती का याबाबत नागरिक प्रश्न विचारित आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -