घरपालघरअवजड वाहनांवर कारवाई

अवजड वाहनांवर कारवाई

Subscribe

या कारखान्यांमध्ये कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक करण्यासाठी रोज हजारो ट्रेलर्स,कंटेनर्स,ट्रक्स आणि टँकरसारखी अवजड वाहनांची वाहतूक होत असते.

वाणगाव : बोईसरच्या मुख्य रस्त्यावर बेकायदा पार्कींग केलेल्या अवजड मालवाहू वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. बोईसर-पालघर मुख्य रस्ता अडवून वाहतुकीस अडथळा आणणार्‍या अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम पोलिसांनी हाती घेतली आहे. पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बोईसर परिसरातील मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांच्या बेकायदा पार्कींगचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला असून सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी सोबतच अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये पोलाद,अभियांत्रीकी,औषधे,रासायनिक आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील जवळपास बाराशे कारखाने असून दोन ते अडीच लाखांच्या संख्येत कामगार काम करीत आहेत. या कारखान्यांमध्ये कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक करण्यासाठी रोज हजारो ट्रेलर्स,कंटेनर्स,ट्रक्स आणि टँकरसारखी अवजड वाहनांची वाहतूक होत असते.

या वाहनांच्या पार्कींगसाठी अधिकृत वाहन तळ नसल्याने ही अवजड वाहने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांबरोबरच बोईसर,सरावली या ग्रामपंचायत हद्दीतील नागरी क्षेत्र असलेल्या रस्त्यांवर तसेच बोईसर-चिल्हार या मुख्य मार्गावर खैरापाडा, बेटेगाव आणि मान या गावांच्या हद्दीत दोन्ही बाजूस बेकायदशीरपणे पार्कींग करत असल्याने सकाळी कारखान्यात कामावर जाण्यासाठी तसेच संध्याकाळी कामावरून घरी परतणार्‍या लाखो कामगारांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. बेकायदा पार्कींगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होत चालल्याने बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मोंढे ,पोलीस हवालदार मासरे,पोलीस नाईक कांबळे,पोलीस नाईक कुलाल, पोलीस नाईक पवार यांनी बोईसर पालघर रस्त्यावरील यशवंतसृष्टी साईबाबा मंदिराजवळ बेकायदा उभ्या असलेल्या अवजड मालवाहू वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला असून हजारो रूपयांचा दंड वसूल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -